...अब तुम्हारे हवाले....अफगाणिस्तान!

By admin | Published: December 29, 2014 03:57 AM2014-12-29T03:57:00+5:302014-12-29T03:57:00+5:30

अफगाणिस्तानमधील मोहीम आटोपून अमेरिका आणि नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय फौजा माघारी परतण्याच्या तयारीत आहेत.

... handed you now .... Afghanistan! | ...अब तुम्हारे हवाले....अफगाणिस्तान!

...अब तुम्हारे हवाले....अफगाणिस्तान!

Next

काबूल : अफगाणिस्तानमधील मोहीम आटोपून अमेरिका आणि नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय फौजा माघारी परतण्याच्या तयारीत आहेत.
सलग तेरा वर्षे दररोज युद्धाला सामोरे जात तालिबानी दहशतवाद्यांच्या मगरमिठीतून अफगाणी जनतेची सुरक्षा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय फौजांनी अफगाणिस्तानमधील मोहिमेला पूर्णविराम दिला.
यासाठी रविवारी काबूलस्थित आयएसएएफच्या मुख्यालयात एका प्रतीकात्मक समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी ही दीर्घ युद्धात मरण पावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आव्हाने कायम असली तरी त्यावर आम्ही यशस्वी मात करू, असा विश्वास आयएसएएफचे कमांडर जन. जॉन कॅम्पबेल यांनी यावेळी व्यक्त केला. अफगाणिस्तानच्या लष्कराच्या हाती देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविली जाणार आहे; परंतु, अलीकडे घडलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढत हिंसाचार घडविल्याने आंतरराष्ट्रीय फौजाच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह लागले आहे.

Web Title: ... handed you now .... Afghanistan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.