'भारत सुरक्षा परिषदेचा सदस्य होऊ नये म्हणून शेजारी राष्ट्रांचा प्रयत्न', हरीश यांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 10:47 IST2024-11-21T10:46:57+5:302024-11-21T10:47:25+5:30

कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स या संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी जागतिक आव्हाने पेलण्यासाठी भारताने अंगीकारलेला मार्ग या विषयावर त्यांनी भाषण केले. 

Harish expressed displeasure at efforts by neighboring countries to prevent India from becoming a member of the Security Council | 'भारत सुरक्षा परिषदेचा सदस्य होऊ नये म्हणून शेजारी राष्ट्रांचा प्रयत्न', हरीश यांनी व्यक्त केली नाराजी

'भारत सुरक्षा परिषदेचा सदस्य होऊ नये म्हणून शेजारी राष्ट्रांचा प्रयत्न', हरीश यांनी व्यक्त केली नाराजी

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या रचनेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींच्या गतीबाबत भारत नाराज आहे. भारत हा सुरक्षा परिषदेचा सदस्य बनण्याची शक्यता आहे, असे वाटल्याने काही शेजारी देश या परिषदेत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशी टीका भारताचे संयुक्त राष्ट्रांतील प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी केली. या टीकेचा रोख पाकिस्तान, चीनकडे होता. 

कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स या संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी जागतिक आव्हाने पेलण्यासाठी भारताने अंगीकारलेला मार्ग या विषयावर त्यांनी भाषण केले. 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा आता विस्तार होणे आवश्यक आहे. या परिषदेचे जे कायमस्वरूपी सदस्य आहेत, ते आपली जागा रिकामी करू इच्छित नाहीत. भारताला सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळू नये म्हणून काही शेजारी देश प्रयत्नशील आहेत.

Web Title: Harish expressed displeasure at efforts by neighboring countries to prevent India from becoming a member of the Security Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.