CoronaVirus News : जंतुनाशक फवारल्याने कोरोना नष्ट होणार नाही, WHOने दिला 'गंभीर' इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 22:41 IST2020-05-17T22:25:12+5:302020-05-17T22:41:46+5:30
जंतुनाशकांचा वापर करायचाच असेल, तर एखाद्या कपड्याच्या सहाय्याने केला जाऊ शकतो. यामुळे यातील हानीकारक गोष्टी हवेत पसरणार नाहीत आणि काही नुकसानही होणार नाही.

CoronaVirus News : जंतुनाशक फवारल्याने कोरोना नष्ट होणार नाही, WHOने दिला 'गंभीर' इशारा!
जिनेव्हा : जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे, की रस्त्या आणि गल्ल्यांमध्ये जंतुनाशक फवारल्याने कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही. अशा प्रकारची फवारणी मानवाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे, की एखाद्या रसायनाची फवारणी केल्याने पृष्ठभागावरील व्हायरस अथवा जंतू नष्ट होत नाही. अशा पद्धतीची फवारणी, घाण आणि मलब्यात एकत्र होऊन प्रभावशून्य होते. एवढेच नाही, तर ते सर्व ठिकाणी न पोहोचल्याने संक्रमणाचा धोका अधिक वाढतो.
लोकांवर जंतुनाशकांची फवारणी करू नये -
डब्ल्यूएचओने स्पष्टपणे सांगितले, की कोणत्याही परिस्थितीत लोकांवर जंतुनाशकांची फवारणी करू नये. क्लोरिन आणि इतर विषारी केमिकलची फवारणी केल्याने डोळ्यांची जळजळ, त्वचेचे इंफेक्शन आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की लोकांवर क्लोरीन अथवा इतर कुठल्याही विषारी रसायनाची फवारणी केल्यास, ब्रोन्कोस्पास्म आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सारखे हानिकारक प्रभाव पडू शकतात. जर जंतुनाशकांचा वापर करायचाच असेल, तर एखाद्या कपड्याच्या सहाय्याने केला जाऊ शकतो. यामुळे यातील हानीकारक गोष्टी हवेत पसरणार नाहीत आणि काही नुकसानही होणार नाही. यापूर्वी अल्कोहल युक्त जंतुनाशक (हँड सॅनिटायझर)च्या वापराची शिफारस करत, कोरोनाविरोधात हे प्रभावी असल्याचे दिसून आल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले होते.
CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा
जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 46 लाखवर -
जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येने आता 46 लाखांचा टप्पाही पार केला आहे. तर यामुळे मरणारांचा आकडा तीन लाखहून अधिक झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. येथे गेल्या 24 तासांत 1237 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!