भयग्रस्त मुस्लिमांसाठी टिष्ट्वटरवर हॅशटॅग मोहीम
By admin | Published: December 16, 2014 04:43 AM2014-12-16T04:43:26+5:302014-12-16T04:43:26+5:30
सिडनीच्या ओलिस नाट्यात सुरक्षा दलाच्या अभियानासोबत टिष्ट्वटरवरही एक मोहीम चालवली जात होती
सिडनी : सिडनीच्या ओलिस नाट्यात सुरक्षा दलाच्या अभियानासोबत टिष्ट्वटरवरही एक मोहीम चालवली जात होती. हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या मुस्लिम बांधवांचे मनोबल उंचावण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. बंदूकधारी व्यक्तीने ओलिस व्यक्तींना एक झेंडा उंचावण्यास सांगितले. यावर अरबीतून काहीतरी लिहिण्यात आले होते. कॅफेत ओलिस ठेवणारी व्यक्ती ही मुस्लिम दहशतवादी वा त्या विचारधारेने प्रभावित असण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली.
अशात शहरातील सर्वसामान्य मुस्लिमांकडे शंकेच्या नजरेतून पाहिले जाऊ नये म्हणून टिष्ट्वटरवर मोहीम सुरू झाली. हॅशटॅग #’्र’’१्रीि६्र३ँ८ङ्म४ (आय विल राईड विथ यू) सह नागरिक वंशभेदविरोधी मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेत असल्याचे दिसून आले. हल्ल्यानंतर गैरसमजातून मुस्लिमांना लक्ष्य केले जाऊ नये, या उद्देशाने मोहिमेत सहभाग घेत असल्याचे चित्र होते. केवळ सिडनीतच नाही, तर आॅस्ट्रेलियाबाहेरही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक वंशभेद रोखण्यासाठी मुस्लिमांसोबत सार्वजनिक प्रवास करण्याची तयारी दाखवत आहेत. मला आॅस्ट्रेलियन असल्याचा अभिमान वाटतो, असे टिष्ट्वट डेल इराणी हिने केले आहे. आय विल राईड विथ यू नामक मोहीम ज्याने सुरू केली असेल त्याचे खूप आभार. यावरून स्पष्ट होते की, द्वेषाला हरवणे किती सोपे आहे, असे टिष्ट्वट अली ए माहदी यांनी केले आहे.