‘हसीनांची हकालपट्टी हे तर बांगलादेशचे दुसरे स्वातंत्र्य’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 06:26 AM2024-08-09T06:26:03+5:302024-08-09T06:26:44+5:30
मुहम्मद युनूस यांच्या हंगामी सरकारमध्ये पंधरा सदस्यांचा समावेश असणार आहे.
ढाका : बांगलादेशी नागरिकांना सुरक्षेची हमी देणारे सरकार आम्ही चालविणार आहोत, असे तेथील हंगामी सरकारचे प्रमुख व नोबेल शांतता पुरस्काराचे विजेते मुहम्मद युनूस यांनी गुरुवारी सांगितले. बांगलादेशची पुन:उभारणी करण्यासाठी जनतेने आम्हाला मदत करावी, असेही आवाहन युनूस ऑलिम्पिक स्पर्धा पाहण्यासाठी पॅरिसला गेले होते. ते गुरुवारी दुबईमार्गे बांगलादेशमध्ये परतले. त्यांचे विमानतळावर लष्करप्रमुख वकार-उझ-झमान, अन्य वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी नेत्यांनी स्वागत केले.
हंगामी सरकार किती काळ हे गुलदस्त्यात :
मुहम्मद युनूस यांच्या हंगामी सरकारमध्ये पंधरा सदस्यांचा समावेश असणार आहे. बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर जो पक्ष विजयी होईल त्याचे सरकार सत्तेवर येईल. मात्र, युनूस यांचे हंगामी सरकार किती काळ सत्तेवर असेल याबद्दल लष्कराने घोषणा केलेली नाही.