घृणास्पद - दत्तक घेतलेल्या पाच मुलींवर केला 729 वेळा बलात्कार

By admin | Published: June 25, 2017 11:01 PM2017-06-25T23:01:54+5:302017-06-25T23:14:25+5:30

दत्तक घेतलेल्या पाच मुलींवर बलात्कार एका व्यक्तीने पाच वर्ष दररोज बलात्कारर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Hateful: 729 rapes committed to five adopted girls | घृणास्पद - दत्तक घेतलेल्या पाच मुलींवर केला 729 वेळा बलात्कार

घृणास्पद - दत्तक घेतलेल्या पाच मुलींवर केला 729 वेळा बलात्कार

Next

ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 25 - दत्तक घेतलेल्या पाच मुलींवर एका व्यक्तीने सलग पाच वर्ष दररोज बलात्कारर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियामध्ये एका व्यक्तिवर दत्तक घेतलेल्या मुलींवर 729 वेळा बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दत्तक घेतलेल्या 5 मुलींवर आरोपीने रोज बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलींचे वय 17 वर्षांपेक्षाही कमी असल्याची माहिती समोर आली आहे. काही न्यायालयीन कारणास्तव त्या व्यक्तिचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
रशियातील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, सर्व मुली अनाथ असून एका सरकारी योजनेद्वारे अनाथालयाने या सर्व मुलींना आरोपी व्यक्तिला दत्तक दिले. आरोपीने दत्तक मुलींच्या देखभालीची सर्व जबाबदारी घेतली आणि त्याबदल्यात सरकारी योजनेद्वारे प्रत्येक महिन्याला 22 हजार रुपये मिळतात. दत्तक घेतल्यानंतरच्या 5 वर्षांत आरोपीने मुलींवर शेकडोवेळा बलात्कार केला.
पीडित मुलींनी नराधमाच्या राक्षसी कृत्याची माहिती शाळेतील शिक्षकांना दिल्यावर हे प्रकरण उघड झाले. शिक्षकांनी त्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या नराधमाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलींना रोज शारीरिक संबंध बनवण्यासाठी दबाव टाकत असे. सप्टेंबर 2012 ते 2017 दरम्यान आरोपीने पाचही पीडित मुलींचे लैगिक शोषण केले आहे.
याबाबत बोलताना स्थानिक शिक्षक मंत्र्यांनी तरुण मुलींना एकटे राहणाऱ्या पुरूषाला दत्तक कसे देण्यात आले, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाचही पीडित मुलींना पुन्हा अनाथालयात पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीवरील बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास रशियन कायद्यानुसार त्याला 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

Web Title: Hateful: 729 rapes committed to five adopted girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.