ऐकत नाही, उद्धट वागतो म्हणून मूल रुग्णालयात टाकून ‘ती’ निघून गेली
By admin | Published: March 13, 2016 11:10 PM2016-03-13T23:10:47+5:302016-03-13T23:10:47+5:30
अजिबात ऐकत नाही, उद्धट वागतो म्हणून हा मला माझ्या घरात नको, अशी चिठ्ठी लिहून आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात टाकून आई निघून गेली.
लॉस एंजिल्स : अजिबात ऐकत नाही, उद्धट वागतो म्हणून हा मला माझ्या घरात नको, अशी चिठ्ठी लिहून आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात टाकून आई निघून गेली.
ही घटना पश्चिम जॉर्डनच्या उताह येथील जॉर्डन व्हॅली मेडिकल सेंटरमध्ये गेल्या महिन्यात घडली. या आईवर मुलाशी गैरवर्तन करणे आणि त्याला टाकून जाण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाला तर तिला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. या महिलेने मुलाच्या पाठीवरील पिशवीत मावतील एवढेच कपडे त्याच्यासोबत दिले होते व चिठ्ठी लिहिली. तीत म्हटले होते की, ‘हा मुलगा उद्धट आणि न ऐकणारा आहे. मला तो माझ्या घरात अजिबात नको आहे. मी वाईट आई आहे, असे मला अजिबात वाटत नाही. मला त्याने फारच जेरीस आणले आहे,’ असे या महिलेने म्हटल्याचे ‘फॉक्स थर्टीन’ ने वृत्त दिले. पालक जेव्हा अशा परिस्थितीला तोंड देतात तेव्हा त्यांच्या मदतीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत; परंतु या महिलेने जे काही केले ते मान्य न होणारे आहे, असे साल्ट लेक सिटी डिस्ट्रिक्ट अॅटर्नी सिम गिल यांनी म्हटले. तुम्ही जेव्हा मुलांशी वाईट वागता, त्यांना टाकून देता तेव्हा त्यांना शारीरिक किंवा मानसिक दहशत निर्माण होते व स्वत:चे संरक्षण करू न शकणाऱ्या मुलांचा विचार करता ही बाब मोठ्याच काळजीची आहे, असे गिल म्हणाल्याचे वृत्त आहे. तो मला नावाने हाका मारायचा. तो सार्वजनिक ठिकाणी स्वत:ची पँट खाली ओढायचा, असे तिने सांगितले.
या मुलाला संगोपन केंद्रात ठेवण्यात आल्यापासून त्याची आई आणि वडील परत एकत्र आले आहेत. त्याची आई त्याला आता भेटायलाही येते. ती म्हणाली, ‘तो परत घरी यावा असे मला वाटते आणि त्याचीही तशी इच्छा आहे.’