देवमाशाच्या पोटातून तो पडला सुखरूप बाहेर

By Admin | Published: June 29, 2017 07:20 AM2017-06-29T07:20:03+5:302017-06-29T07:20:03+5:30

‘जाको राखें सांईया मार सके न कोय’, अशी एक म्हण आहे. (ईश्वर ज्याचे रक्षण करतो त्याला कोणीही मारू शकत नाही.) स्पेनमधील एका मच्छीमाराला या म्हणीचा प्रत्यय आला.

He fell down from the stomach of a goddess | देवमाशाच्या पोटातून तो पडला सुखरूप बाहेर

देवमाशाच्या पोटातून तो पडला सुखरूप बाहेर

googlenewsNext

माद्रीद : ‘जाको राखें सांईया मार सके न कोय’, अशी एक म्हण आहे. (ईश्वर ज्याचे रक्षण करतो त्याला कोणीही मारू शकत नाही.) स्पेनमधील एका मच्छीमाराला या म्हणीचा प्रत्यय आला. तीन दिवसांपूर्वी एका देवमाशाने आपल्याला जिवंत गिळले होते. मात्र, आपण त्याच्या पोटातून सुखरूप बाहेर आलो, असा या मच्छीमाराचा दावा आहे. मच्छीमार आणि समुद्र यांचे नाते अभिन्न असते. पाण्यात जलचर प्राण्यांसह अनेक धोके असतात.
मात्र, मासे पकडण्यासाठी त्यांना समुद्रात जावेच लागते. स्पेनमधील हा मच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्रात गेला होता. मात्र, समुद्रात अचानक आलेल्या मोठ्या लाटेत तो अडकला. तेव्हाच महाकाय देवमासा तेथे आला. त्याने क्षणार्धात या मच्छीमाराला गिळले. मच्छीमार देवमाशाच्या पोटात गेला. तो तीन दिवस आणि रात्री देवमाशाच्याच पोटात राहिला. त्याच्या पोटातील मासे खाऊन आपण जिवंत राहिलो, असे या मच्छीमाराचे म्हणणे आहे.
हा मच्छीमार बेपत्ता झाल्यानंतर तटरक्षक दलाने तीन दिवस शोधमोहीमही राबविली. मात्र, तो सापडला नाही. चौथ्या दिवशी तो स्वत:च समुद्र किनाऱ्यावर आला. देवमाशाने उलटी करून आपल्याला तोंडाद्वारे बाहेर काढले, असा दावा या मच्छीमाराने केला.

Web Title: He fell down from the stomach of a goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.