अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:45 IST2025-04-11T17:07:31+5:302025-04-11T17:45:21+5:30
अमेरिकेने भारतीय व्यावसायिक जुगविंदर सिंह ब्रार आणि त्यांच्या ४ कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत?
भारतीय व्यावसायिक जुगविंदर सिंह ब्रार आणि त्यांच्या चार कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. त्यांच्याविरोधात इराणी तेल वाहतूक केल्याच्या आरोप आहे. यामुळेच ही बंदी घालण्यात आली आहे. जुगविंदर सिंह ब्रार यांच्याकडे अनेक जहाजे आहेत आणि त्यांच्याद्वारे त्यांनी इराणी तेल निर्यात आणि आयात केले आहे, असं अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचे म्हणणे आहे. अमेरिकेने इराणसोबत व्यापारावर बंदी घातली आहे. यानंतरही, जुगविंदर सिंह ब्रार यांनी इराणसोबतचे व्यवहार आणि व्यवसाय सुरू ठेवला, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अमेरिकेने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ब्राररची जहाजे चालवणाऱ्या यूएई आणि भारतस्थित दोन कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या जहाजांमधून इराणचे तेल इतर देशांमध्ये पाठवले जाते.
म्यानमारमध्ये भारतीय लष्करांचे Robo-Dogs पोहोचले मदतीला; भूकंपात दबल्या गेलेल्यांचा घेताहेत शोध
निवेदनात म्हटले आहे की, ब्रार याची जहाजे हाय रिस्क शिप टू शिप ट्रान्फरमध्ये सहभागी होती. ही जहाजे इराण, इराक, युएई आणि ओमानच्या आखातादरम्यान कार्यरत आहेत. या जहाजांमधून तेल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवत होते. या जहाजांनी इराणी तेलासाठी सुविधा पुरवण्याचे काम केले आहे आणि हे निर्बंधांचे थेट उल्लंघन आहे. अमेरिकेचे मंत्री स्कॉट बेसंट म्हणाले की, हे इराणचे कार्यरत मॉडेल आहे. ते अनेकदा बेकायदेशीर जहाजांशी आणि ब्रार सारख्या दलालांमार्फत व्यवहार करतात.
जुगविंदर सिंह ब्रार कोण आहे?
जुगविंदर सिंह ब्रार हे युएईमध्ये राहतात. त्यांच्या दोन कंपन्या आहेत - प्राइम टँकर्स आणि ग्लोरी इंटरनॅशनल. अशी या कंपन्यांची नावे आहेत. ते सुमारे ३० जहाजासारखे पेट्रोलियम टँकर चालवतात. यापैकी बहुतेक लहान टँकर आहेत, हे लहान टँकर मोठ्या टँकरमधून येणारे तेल पोहोचवतात. या टँकरद्वारे समुद्रमार्गे तेल इतर ठिकाणी नेले जाते. या छोट्या जहाजांमधून ते इराणी तेलाची वाहतूक करत होते. हे देखील तेल तस्करीचे प्रकरण असल्याचे मत अमेरिकेचे आहे. जुगविंदर सिंह ब्रार यांनी इराण समर्थित सशस्त्र संघटना हुथीसोबतही काम केले असल्याचा दावा अमेरिकेचा आहे.