थायलंडच्या सेक्स टूरसाठी 'त्याने' केली पत्नीची हत्या
By admin | Published: October 31, 2016 10:27 AM2016-10-31T10:27:45+5:302016-10-31T10:27:45+5:30
ग्रेसची हत्या केल्यानंतर हॉर्स्टने तिच्या बँक खात्यातून सर्व पैसे काढून घेतले. हॉर्स्टने अत्यंत क्रूर पद्धतीने ग्रेसची हत्या केली.
Next
ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. ३१ - थायलंडला जाऊन सेक्स टूरची मजा लुटता यावी यासाठी जर्मनीतील एका संगणक तज्ञाने पत्नीची हत्या केली. हॉर्स्ट कोईंग (५३)असे आरोपीचे नाव असून त्याने बावारीयाच्या कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. थायलंडला सेक्स टूरला जाण्यामध्ये पत्नी ग्रेसचा (३७) अडथळा होता म्हणून तिची हत्या केल्याचे हॉर्स्टने कबूल केले.
ग्रेसची हत्या केल्यानंतर हॉर्स्टने तिच्या बँक खात्यातून सर्व पैसे काढून घेतले. हॉर्स्टने अत्यंत क्रूर पद्धतीने ग्रेसची हत्या केली. त्याने ३० नोव्हेंबर २०१५ च्या रात्री ग्रेस गाढ झोपेत असताना प्लास्टिक बॅगने तिचे तोंड दाबून धरले त्यामुळे गुदमरुन तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने ग्रेसच्या शरीराचा आठ तुकडे करुन एका प्लास्टिक बॅगमध्ये भरले व ती बॅग आणून गोदामात ठेवली.
२ डिसेंबरला थायलंडला जाण्यापूर्वी त्याने मित्रपरिवाला कुटुंबातील सदस्यांना एक ईमेल पाठवला. त्यात त्याने ग्रेस मला सोडून फिलीपाईन्सला निघून गेली आहे मी तिला परत मिळवेन असे ईमेलमध्ये लिहीले होते. त्यानंतर हॉर्स्ट तीन आठवडे थायलंडमध्ये होता. पुन्हा जर्मनीत परतताच त्याला अटक झाली. हॉर्स्टने सुनियोजित कट रचून ही हत्या केली. हत्या करण्यापूर्वी त्याने एक गोदाम भाडयाने घेतले होते. तिथे त्याने हत्या कशी करावी याचा अभ्यास करण्यासाठी एक संगणक आणून ठेवला होता.