विमान अपहरणकर्त्यासोबतच त्याने काढला 'सेल्फी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2016 02:13 PM2016-03-30T14:13:00+5:302016-03-30T14:13:39+5:30
मंगळवारी इजिप्त एअरलाईन्स विमानाचे अपहरण झालेले असताना विमानातील प्रवाशाने अपहरणकर्त्यासोबतच सेल्फी काढला.
Next
>ऑनलाइन लोकमत
कैरो, दि. ३० - सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात सेल्फीचे वेड भलतेच वाढले असून त्यापायी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार मंगळवारी इजिप्त एअरलाईन्सच्या अपहरण नाट्यादरम्यानही घडला. या अपहरणामुळे संपूर्ण जग चिंतेत असताना अपहरित विमानातील एक प्रवासी मात्र त्या अपहरणकर्त्यासोबतच हसत हसत सेल्फी काढत होता. हा सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर भरपूर टीकाही होत आहे.
बेजांमिन इन्स असे त्या २६ वर्षीय तरूणाचे नाव असून तो अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या इजिप्त एअरच्या MS181 विमानातून प्रवास करत होता. मात्र इजिप्तचा नागरिक असलेल्या सैफ अल दिन मुस्तफाने काल विमानाचे अपहरण केले, प्रेयसीला भेटण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे त्याने स्पष्ट केले होते. बेंजामिनने मुस्तफासोबत काढलेल्या सेल्फीमध्ये मुस्तफाच्या शरीरावरील स्फोटकांचा बेल्टही दिसत आहे. मात्र बेंजामिनने असे का केले ते काही स्पष्ट झालेले नाही.
वेगळे राहणाऱ्या प्रेयसीच्या भेटीसाठी सैफ अल दिन मुस्तफाने हे अपहरण केले. त्याची प्रेयसी सायप्रसची असून ती या बेटावर रहाते. द इजिप्त एअरचे एअरबस ए-३२० विमान येथील तळावर सकाळी ८.५० वाजता (स्थानिक वेळ) उतरविले गेले. त्याआधी २० मिनिटे अपहरणकर्त्याने विमानाचा मार्ग बदलण्यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. अलेक्झांड्रियाहून कैरोला निघालेल्या या विमानात त्याने कमरेला बांधलेल्या स्फोटकांच्या पट्ट्यांचा स्फोट घडविण्याची धमकी दिली होती