तो व्हीलचेअरवर, म्हणून फाशी टळली
By admin | Published: September 22, 2015 10:22 PM2015-09-22T22:22:13+5:302015-09-22T22:22:13+5:30
त्या व्यक्तीला पाकिस्तानात आज फाशीची शिक्षा होणार होती; पण व्हीलचेअरवरील अपंग व्यक्तीला फाशी देता येत नाही. म्हणून तूर्तास ही शिक्षा टळली.
Next
इस्लामाबाद : त्या व्यक्तीला पाकिस्तानात आज फाशीची शिक्षा होणार होती; पण व्हीलचेअरवरील अपंग व्यक्तीला फाशी देता येत नाही. म्हणून तूर्तास ही शिक्षा टळली.
४३ वर्षीय अब्दुल बासितला पंजाबच्या फैसलाबाद जेलमध्ये फाशी देण्यात येणार होती. २००९ मधील एका खून प्रकरणात तो दोषी आहे. दरम्यान, लकव्यामुळे हा आरोपी सध्या व्हीलचेअरवर आहे. अशा आजारी व्यक्तीला फाशी देता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला असून तूर्त ही फाशी टळली आहे. (वृत्तसंस्था)