आयुष्यभराची कमाई तो चितेवर घेऊन गेला
By admin | Published: October 11, 2015 11:35 PM2015-10-11T23:35:26+5:302015-10-11T23:35:26+5:30
म्हातारपणात दोन मुलांनी सांभाळले नसल्यामुळे दु:खी झालेल्या बापाने आपली आयुष्यभराची कमाई रोख ३३ हजार डॉलर (२१.४५ लाख रुपये) मुलांना न देता आपल्या चितेवर ठेवून अंत्यसंस्कार करून घेतले
बीजिंग : म्हातारपणात दोन मुलांनी सांभाळले नसल्यामुळे दु:खी झालेल्या बापाने आपली आयुष्यभराची कमाई रोख ३३ हजार डॉलर (२१.४५ लाख रुपये) मुलांना न देता आपल्या चितेवर ठेवून अंत्यसंस्कार करून घेतले. तशी अंतिम इच्छा या कचरा वेचून पोट भरणाऱ्या बापाने लिहून ठेवली होती.
पूर्व चीनच्या जिग्यांसू प्रांतातील शेतकरी तावो याने आपल्या मृत्युपत्रात माझ्या मृत्यूनंतर चितेसोबतच माझी आयुष्यभराची कमाई जाळण्यात यावी, असे म्हटले होते. दोन्ही मुलांनी त्याने विनंती करूनही सांभाळण्यास नकार दिल्यानंतर हा म्हातारा भाड्याच्या खोलीत राहायचा व तेथेच त्याचे निधन झाले. अंत्यसंस्कार होण्याच्या वेळी तावोच्या शेजाऱ्याने हे ३३ हजार डॉलर त्याच्या चितेवर ठेवले.