Penguin: समुद्र किनाऱ्यावर सापडले डोके धडावेगळे झालेले पेंग्विन, संशयास्पद प्रकारामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 09:47 PM2022-04-30T21:47:35+5:302022-04-30T21:48:08+5:30
Penguin: ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यांवर अत्यंत खळबळजनक चित्र दिसले आहे. येथे समुद्रातून अनेक मृत पेंग्विन वाहत आले आहेत. त्यांचे डोके धडावेगळे झालेले असल्याने खळबळ उडाली आहे.
मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यांवर अत्यंत खळबळजनक चित्र दिसले आहे. येथे समुद्रातून अनेक मृत पेंग्विन वाहत आले आहेत. त्यांचे डोके धडावेगळे झालेले असल्याने खळबळ उडाली आहे. पेंग्विनची अशी अवस्था पाहून शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेंग्विन डोके तुटलेल्या अवस्थेत सापडण्याचे कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.
केवळ एप्रिल महिन्यातच दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या फ्लेरियू पेनिनसुलामधील समुद्र किनाऱ्यावर सुमारे २० पेंग्विनचे मृतदेह सापडले. २०२१ मध्ये या परिसरात पेंग्विनचे जेवढे मृतदेह सापडले होते. त्यापेक्षा हा आकडा खूप मोठा आहे.
दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये स्टीफन हेजेस या मृत पेंग्विनचे मृतदेह एकत्र करत आहेत. त्यामाध्यमातून या पेंग्विनची डोकी धडावेगळी कशी काय झाली. त्यामागे कारण काय आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
समुद्राच्या किनाऱ्यांवर पेंग्विनचे धडच नाही तर कापलेली डोकीही सापडत आहेत. या प्रकरणामध्ये मानवी हात असल्याची शक्यता फेटाळून लावण्यात आलेली आहे. कारण हे मृत्यू समुद्रात हो आहे. मात्र स्टिफन हेजेस यांनी सांगितले की, या परिसरात मोठ्या प्रमाणात जहाजांचा वावर असल्याने मासेमारी करणाऱ्या नौकांच्या पंख्याने कापून या पेंग्विनचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
त्यांनी सांगितले की आम्हाला समुद्र किनाऱ्यावर दर महिन्याला एक किंवा दोन मृत पेंग्विन मिळायचे. मात्र एप्रिल महिन्यामध्येच आम्हाला १५ ते २० मृत पेंग्विन मिळाले. कधी कधी तर एका दिवसामध्ये तीन मृतदेहसुद्धा मिळाले आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की या पेंग्विनचे डोके एकाच प्रयत्नात धडावेगळे झाले होते.