नीरव माेदीच्या प्रत्यार्पणाबाबत २८ जूनला होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 01:29 PM2022-05-03T13:29:06+5:302022-05-03T13:30:10+5:30
ब्रिटनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव माेदीच्या प्रत्यार्पणाबाबत लंडन उच्च न्यायालयात २८ जून राेजी सुनावणी हाेणार आहे.
लंडन : पंजाब नॅशनल बँकेची काेट्यवधी रुपयांची फसवणूक करून ब्रिटनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव माेदीच्या प्रत्यार्पणाबाबत लंडन उच्च न्यायालयात २८ जून राेजी सुनावणी हाेणार आहे.
गेल्या वर्षी कनिष्ठ न्यायालयाने प्रत्यार्पणास मंजुरी दिली हाेती. मात्र, नीरव माेदीने त्यास मानसिक प्रकृतीच्या आधारे आव्हान दिले हाेते. नीरव माेदी हा आत्महत्या करण्याचा खूप जास्त धाेका असल्याचा दावा करण्यात आला आहे. कनिष्ठ न्यायालयाने या मुद्याकडे दुर्लक्ष करून प्रत्यार्पणाचा दिलेला निर्णय याेग्य हाेता का, याबाबत उच्च न्यायालय समीक्षा करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव माेदीच्या शारीरिक आणि मानसिक आराेग्याची काळजी घेण्याची याेग्य साेय करण्याचे आश्वासन भारत सरकारने दिले आहे. गेल्या सुनावणीवेळी नीरव माेदीच्या वकिलांनी ताे आत्महत्या करू शकतो आणि मुंबईत त्याची प्रकृती आणखी खालावण्याचा धाेका असल्याचा दावा केला हाेता. महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या आर्थर राेड तुरुंगात आत्महत्या राेखण्याच्या पुरेशा उपाययाेजना आहेत का, हादेखील याचिकेमधील प्रमुख मुद्दा आहे.