हृदयद्रावक! ३५ वर्षांनंतर वडिलांना पाहिले आणि १० मिनिटांतच मुलाला मृत्यूने गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:43 PM2021-10-06T18:43:54+5:302021-10-06T18:44:16+5:30
Accident News: तब्बल ३५ वर्षांनंतर आपल्या वडिलांना पाहिल्यानंतर काही वेळातच एका प्रसिद्ध बायकरचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ५६ वर्षीय पॉल कॉवेनचा सोमवारी एका टुरिस्ट व्हॅनला बाईक आदळल्याने अपघात होऊन मृत्यू झाला.
नवी दिल्ली - तब्बल ३५ वर्षांनंतर आपल्या वडिलांना पाहिल्यानंतर काही वेळातच एका प्रसिद्ध बायकरचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ५६ वर्षीय पॉल कॉवेनचा सोमवारी एका टुरिस्ट व्हॅनला बाईक आदळल्याने अपघात होऊन मृत्यू झाला. पॉल कॉवेन मॅन टीटी माऊंटेन कोर्स एका, मोटारसायकल रोड-रेसिंग सर्किटमध्ये होते.
ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तिथे कुठल्याही प्रकारची स्पीड लिमिट नव्हती. तसेच हा रस्ताही खूप वळणावळणांचा होता. माऊंटेन रोड गुथरीजवर चढाई करत असताना पॉल यांच्या डोळ्यांवर सूर्याची किरणे पडली आणि त्यानंतर त्यांची बाईक अपघातग्रस्त झाली. मोटारबाईक प्रेमी असलेल्या पॉल यांचा जन्म फ्लीटवूडमध्ये स्थायिक होण्यापूर्वी ऑईल ऑफ मॅनमध्ये झाला होता.
पॉल यांची २२ वर्षीय सावत्र मुलगी डेमी रामशॉ हिने सांगितले की, ही अत्यंत भयावह गोष्ट आहे. पॉल त्यांच्या वडिलांना पुन्हा भेटले होते. त्यांनी त्यांच्या वडिलांना ३५ वर्षांपर्यंत पाहिले नव्हते. दोघांची भेट झाल्यानंतर दहा मिनिटांनी पॉल यांना मृत्यूने गाठले. त्यांनी त्यांच्या दोन मुलांना पहिल्यांदा आपल्या आजोबांनी भेटण्यास सांगितले होते.
डेमी रामशॉ हिने सांगितले की, मी आणि माझा जोडीदार डेनी आम्हाला हल्लीच एक मुलगा झाला आहे. तो केवळ १२ दिवसांचा आहे. तसेच तो केवळ एकदाच आपल्या आजोबांना भेटला होता. ही गोष्ट खूपच दु:खद आहे. कुटुंब आता पॉल यांचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी फ्लिटवूडमधील घरी नेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी GoFundMe नावाने मोहीमही चालवली जात आहे.