हृदयद्रावक! पिल्लाला वाचविण्याच्या प्रयत्नात हत्तींचा कळपच वाहून गेला; 6 मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 09:23 AM2019-10-07T09:23:22+5:302019-10-07T10:13:14+5:30

दोन हत्तींना वाचविले

Heartbreaking! elephants drowned in Haew Narok Waterfall; 6 dead | हृदयद्रावक! पिल्लाला वाचविण्याच्या प्रयत्नात हत्तींचा कळपच वाहून गेला; 6 मृत्युमुखी

हृदयद्रावक! पिल्लाला वाचविण्याच्या प्रयत्नात हत्तींचा कळपच वाहून गेला; 6 मृत्युमुखी

Next

बँकॉक : थायलंडमधील खाओ याई नॅशनल पार्कमधील हायू नारोक धबधब्यामध्ये पडून 6 हत्तींचा मृत्यू झाला. पार्कच्या बचाव पथकाने 2 हत्तींना वाचविण्यात यश मिळविले. वाचविण्यात आलेले दोन हत्ती मृत हत्तीच्या मृतदेहाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. शनिवारी हत्तींचा कळप धबधब्याच्या वेगवान प्रवाहामध्ये वाहून गेला होता. या ठिकाणाला नरकाचा खड्डाही म्हटले जाते. 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाचविण्यात आलेल्या हत्तींच्या तब्येतीवर एक आठवडाभर लक्ष ठेवण्यात येणार आहे. घटनेनंतर धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हत्तींचे शव पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. बँकॉकपासून 120 किमी दूरवर हा धबधबा आहे. हा हत्तींचा कळप पिल्लाला वाचविण्यासाठी प्रवाहात उतरला होता.


येथील पशूचिकित्सक चान्या कंचनसाका यांनी सांगितले, दोन्ही हत्ती आता विश्रांती घेत आहेत. पाण्याच्या प्रवाहाला पार करण्यासाठी ताकद खर्ची पडल्याने ते थकलेले आहेत. 


300 जंगली हत्तींचे वास्तव्य
हायू नारोक धबधब्याच्या जवळ एक मोठा खड्डा बनलेला आहे. या खडड्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. 1992 मध्येही धबधब्यामध्ये पडून आठ हत्तींचा मृत्यू झाला होता. या पार्कमध्ये 300 जंगली हत्ती आहेत आणि हे क्षेत्र युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये जंगलाचा समावेश केला आहे.

Web Title: Heartbreaking! elephants drowned in Haew Narok Waterfall; 6 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.