हेलिकॉप्टरनं निघालेलं व-हाड पोहचलं जेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 10:05 PM2017-08-10T22:05:00+5:302017-08-10T22:16:43+5:30

The helicopter has reached the threshold in the jail | हेलिकॉप्टरनं निघालेलं व-हाड पोहचलं जेलमध्ये

हेलिकॉप्टरनं निघालेलं व-हाड पोहचलं जेलमध्ये

ठळक मुद्देव-हाड लग्न समारंभाऐवजी थेट जेलमध्येकाशीमपुरा सेंट्रल जेलमधील घटनाजेल प्रशासनाची तारांबळ चौकशी केल्यानंतर या व-हाडींची सुटका

ढाका, दि. 10 -  लग्नाला निघालेलं व-हाड लग्न समारंभाऐवजी थेट जेलमध्ये गेल्याचं ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. होय, अशीच एक घटना बांगलादेशाची राजधानी ढाकामध्ये असलेल्या काशीमपुरा सेंट्रल जेलमध्ये घडली. विशेष म्हणजे, व-हाड एका खाजगी हेलिकॉप्टरने निघालं होतं.
व-हाड खाजगी हेलिकॉप्टरमधून लग्नासाठी निघालेलं होतं. यावेळी हे हेलिकॉप्टर चुकीमुळं थेट काशीमपुरा सेंट्रल जेलमध्ये उतरलं. हेलिकॉप्टर जेलमध्ये उतरल्यामुळे जेल प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रशासनाला वाटलं की, जेलमधील दहशतवादी कैद्यांची सुटका करण्यासाठी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामुळे तातडीनं जेलमधील सुरक्षा वाढवली आणि हाय अलर्ट देण्यात आला. पोलिसांनी हेलिकॉप्टरला चहूबाजूंनी घेरलं आणि हेलिकॉप्टरसह व-हाडी मंडळींना ताब्यात घेतलं. त्यानंतर व-हाडी मंडळींची चौकशी केल्यानंतर असं समोर आलं की, काशीमपुरा सेंट्रल जेलच्या बाजूला असलेल्या गावातील एका लग्नसमारंभाला हे व-हाड हेलिकॉप्टरमधून चाललं होतं. मात्र, चुकीमुळं त्या गावाऐवजी थेट जेलमध्ये हेलिकॉप्टर उतरलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या व-हाडींची सुटका केली. 
ही घटना चुकीमुळं झाली. मात्र, जेलमधील दहशतवादी कैद्यांची सुटका करण्यासाठी दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत, असं काशीमपुरा सेंट्रल जेलचे महानिरीक्षक ब्रिगेडियर जनरल सय्यद इफ्तेखार उद्दीन यांनी सांगितलं. याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरचा पायलट हवाई दलातील निवृत्त अधिकारी होता. व-हाडी मंडळी मूळचे बांगलादेशी असले तरी राहायला ते मलेशियात आहेत. 

Web Title: The helicopter has reached the threshold in the jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.