नासाने टिपली हेलिकॉप्टरच्या पात्यांची भिरभीर, प्रथमच मंग‌ळावर रेकॉर्ड झाला आवाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 02:03 AM2021-05-09T02:03:19+5:302021-05-09T02:04:09+5:30

सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला जेझेरो क्रॅटरवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा हलकासा आवाज येतो. त्यानंतर इन्जेन्युईटी उड्डाण करते. त्याबरोबर त्याच्या पात्यांची सौम्य भिरभीर ऐकू येते. २,४०० आरपीएम एवढी पात्यांची गती असलेल्या हेलिकॉप्टरने या उड्डाणात मंगळ भूमीवर ८७२ फूटांची सैर केली.

Helicopter wings sound record by NASA on Mars | नासाने टिपली हेलिकॉप्टरच्या पात्यांची भिरभीर, प्रथमच मंग‌ळावर रेकॉर्ड झाला आवाज!

नासाने टिपली हेलिकॉप्टरच्या पात्यांची भिरभीर, प्रथमच मंग‌ळावर रेकॉर्ड झाला आवाज!

Next

वॉशिंगटन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या पर्सेव्हेरन्स रोव्हरने मंगळावर उडविण्यात आलेल्या इन्जेन्युईटी हेलिकॉप्टरच्या पात्यांचा भिरभिरता आवाज रेकॉर्ड केला आहे. मंगळावर अशा प्रकारचा आवाज रेकॉर्ड करण्याची ही पहिलीच घटना आहे. हेलिकॉप्टर उड्डाणाचा नवा व्हिडिओ नासाने शुक्रवारी जारी केला. या व्हिडिओसोबत ऑडिओ ट्रॅकही आहे. रोटोरक्राफ्ट प्रकारातील हे हेलिकॉप्टर सहाचाकी असून मंगळभूमीवरील त्याचे हे चौथे उड्डाण आहे. ३० एप्रिल रोजी हे उड्डाण करण्यात आले होते. (Helicopter wings sound record by NASA on Mars)

सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला जेझेरो क्रॅटरवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा हलकासा आवाज येतो. त्यानंतर इन्जेन्युईटी उड्डाण करते. त्याबरोबर त्याच्या पात्यांची सौम्य भिरभीर ऐकू येते. २,४०० आरपीएम एवढी पात्यांची गती असलेल्या हेलिकॉप्टरने या उड्डाणात मंगळ भूमीवर ८७२ फूटांची सैर केली.

रोव्हरवरील ‘सुपरकॅम मार्स मायक्रोफोन’ने ही कामगिरी केली. मायक्रोफोन विकसित करणाऱ्या टीमचे प्रमुख तथा फ्रान्सच्या ‘ईसाए-सुपाएरो’ संस्थेतील प्रा. डेव्हिड मिमॉन म्हणाले, हा सुखद धक्का आहे. मंगळाच्या वातावरणात आवाज पकडणे जवळपास अशक्य होते. इन्जेन्युईटी उड्डाणाचे नवे रेकॉर्डिंग मंगळाचे वातावरण समजून घेण्यासाठी ‘सोन्याची खाण’ ठरेल. 

विरळ वातावरणामुळे रेकॉर्डिंगचे आव्हान 
पर्सेव्हेरन्स रोव्हर आणि हेलिकॉप्टर यांच्यात २६२ फूट अंतर होते. इतक्या दुरून हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा आवाज मुद्रित करता येईल का, याबाबत या मोहिमेचे अभियंते साशंक होते. तरीही हा आवाज रोव्हरवरील ध्वनी मुद्रण यंत्रणांनी अचूक टिपला. मंगळावरील वातावरण खूपच विरळ आहे. पृथ्वीवरील वातावरणाच्या घनतेच्या तुलनेत मंगळावरील वातावरणाची घनता केवळ १ टक्का आहे. त्यामुळे पृथ्वीच्या तुलनेत तेथे प्रत्येक आवाज मंद होतो. या पार्श्वभूमीवर आवाज टिपण्याचे काम अधिक कठीण होते.
 

Web Title: Helicopter wings sound record by NASA on Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.