सलाम! भारतीय सैन्यानं 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 04:59 PM2017-09-26T16:59:47+5:302017-09-26T17:05:00+5:30
भारताच्या सैनिकांनी काँगोमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या जवानांनी 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं आहे.
नवी दिल्ली - भारताच्या सैनिकांनी काँगोमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या जवानांनी 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं आहे. भारतीय सैनिकांची एक तुकडी सध्या युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन मिशन अंतर्गत रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आहे.
काँगोच्या पूर्व भागातील न्याबिऑन्डो गावांमध्ये भारतीय सैन्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली. 48 तासांच्या मोठ्या मोहिमेनंतर भारतीय सैन्याला 16 मुलं आणि सहा मुलींना वाचवण्यात यश आल्याचे काल भारतीय सैन्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 16 सप्टेंबर रोजी गावांतील लोकांकडून लहान मुलांना काही शस्त्रधारी लोकांची एक तुकडी 'चाइल्ड सोल्जर' बनवत असल्याचे समजलं. त्यानंतर भारतीय सैन्यांनी त्यांच्या तावडीतून 22 जणांची सुटका केली. त्या लहान मुलांना भारतीय सैनिकांनी यूएनच्या चाइल्ड प्रोटेक्शन एजन्सीकडे सुपूर्द केलं. तर लहान मुलांची सुटका केल्यानंतर त्याच दिवशी भारतीय सैन्याच्या दुसऱ्या एका तुकडीनं मिरकी भागातील 200 कुटुंबांना स्थलांतरीत होण्यापासून अडवलं. दोन स्थानिक विरोधी गटांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे ही कुटुंबं स्थलांतरीत होतं होती. त्या सर्वच लोकांमध्ये भयग्रस्थ वातावरणही निर्माण झालं होतं असं सैन्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. पुढे ते म्हणाले की, भारतीय सैन्यांनी त्या समुहाला तेथून बाहेर काढलं त्यामुळे तेथील स्थिती नियंत्रणात आली.
जगभरात सध्या 2600 पेक्षा आधिक भारतीय सैनिक युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन मिशन अंतर्गत कार्यरत आहेत. सर्वात मोठा आणि अवडघड संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशनसाठी हे काम करतात. मध्य आफ्रिकातील राष्टांमध्ये सर्वाधिक भारतीय सैनिक तैनात आहेत.