व्हॅक्यूम क्लिनरच्या साहाय्याने महिला इमारतीवर
By admin | Published: January 14, 2017 01:43 AM2017-01-14T01:43:29+5:302017-01-14T01:43:29+5:30
हे दृश्य पाहिले की, कुणाच्याही काळजाचा ठोका चुकतो. दक्षिण कोरियाच्या राजधानीतील एका गगनचुंबी इमारतीवर केवळ व्हॅक्यूम
Next
सेऊल : हे दृश्य पाहिले की, कुणाच्याही काळजाचा ठोका चुकतो. दक्षिण कोरियाच्या राजधानीतील एका गगनचुंबी इमारतीवर केवळ व्हॅक्यूम क्लिनरच्या सहाय्याने ही महिला उंच उंच चढत जात आहे. गिर्यारोहक म्हणून ओळख असलेल्या या महिलेचे नाव आहे सिएरा ब्लेयर. दोन व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने ती ३३ मजली इमारतीवर चढत आहे. एका खासगी कंपनीच्या बॅटरीच्या प्रचारासाठी तिने हे धाडस दाखविले. उंच इमारतीवर ही सुपरहिरो महिला एक एक मजला चढत होती, तेव्हा उपस्थित श्वास रोखून पाहत होते. हा प्रयोग भलेही व्यावसायिक असेल पण, या महिलेच्या धाडसाला मात्र सलाम करावा लागेल.