इथे रस्ते सांगतात, पायी चालाल तर वाचाल! ब्रिटनमध्ये प्रचलन वाढले, सरकारही देतेय प्रोत्साहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 10:00 AM2022-10-27T10:00:47+5:302022-10-27T10:01:07+5:30
लोकांना पायी चालण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही मुख्य रस्त्यांवर चित्रे काढण्यात आली आहेत.
लंडन : आरोग्यासाठी पायी चालणे, हे चांगले असते. डॉक्टर अनेकदा पायी चालण्याचा सल्ला देतात. मात्र, ब्रिटनमधील लोकांमध्ये स्वत:हून पायी चालण्याचे प्रचलन वाढत आहे. रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासह पर्यावरण रक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार देखील याला प्रोत्साहन देत आहे. लोकांना पायी चालण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही मुख्य रस्त्यांवर चित्रे काढण्यात आली आहेत.
बर्मिंगहॅम येथे डिजिटल जाहिरात फलकांमुळे त्यावर चालणे कठीण झाले आहे. परंतु सरकार संपूर्ण ब्रिटनमध्ये लोकांना पायी चालण्यास प्रोत्साहन देत आहे. साथीच्या रोगाने घडवून आणलेल्या बदलांपैकी हा एक आहे, असे बर्मिंगहॅममधील नगरसेवक लिसा ट्रिकेट यांनी सांगितले.
सायकलींची संख्या ५ अब्ज
२०२१ मध्ये एका व्यक्तीने सरासरी ८९ किमी सायकल चालवली. जी २०१९च्या तुलनेत दीड किमी अधिक आहे. ब्रिटनच्या रस्त्यांवरील सायकलींची संख्या ५ अब्जांवर पोहोचली आहे. सँडविचसाठी कोणीही एक किमी किंवा दोन किमी चालू शकतो, असे ट्रिकेट म्हणाल्या.
पादचाऱ्यांची संख्या वाढणार
- २०५० पर्यंत ब्रिटनला कार्बन उत्सर्जन शून्यावर आणायचे आहे. त्यासाठी हे सर्व उपाय केले जात आहेत. विशेष म्हणजे सत्ताधायांनाही चालण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
- पायी चालण्यासाठी त्यांना इतर सुविधाही दिल्या जात आहेत. यामुळे आगामी काळात ब्रिटनमध्ये पादचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- २०२१ मध्ये मोठ्या संख्येने लोकांनी पायी प्रवास केला.
सरकार चालण्याला प्रोत्साहन देत आहे
■ २०१९ ते २०२१ दरम्यान लोकांनी मोठ्या प्रमाणात पायी प्रवास केला. अपायी प्रवासाचे प्रमाण २६ ते ३१ टक्क्यांनी अधिक होते. कार आणि दुचाकीच्या प्रवासात घट झाली आहे. एक मैलापेक्षा लांब पायी चालण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
■ गरिबांपेक्षा कमी चालणाऱ्या उच्च उत्पन्न गटातील लोकांमध्येही पायी चालण्याचे प्रमाण वाढले आहे. लंडन मधील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, काही झोनमध्ये सायकलिंगपेक्षा चालण्याला अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. मे २०२० मध्ये सरकारने पादचायांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले होते. तसेच पायी चालण्यासाठी योग्य लेन बनविण्याचे आश्वासन दिले होते.