येथे होते बर्फाळ पाण्यात पोहण्याची स्पर्धा

By Admin | Published: March 21, 2017 12:49 AM2017-03-21T00:49:55+5:302017-03-21T00:49:55+5:30

हिवाळ्यात अनेक लोक गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी दोन वेळा विचार करतात. मात्र, काहींना बर्फाळ पाण्यात पोहण्याचीही भीती

Here was the competition for swimming in ice-water | येथे होते बर्फाळ पाण्यात पोहण्याची स्पर्धा

येथे होते बर्फाळ पाण्यात पोहण्याची स्पर्धा

googlenewsNext

बर्लिन : हिवाळ्यात अनेक लोक गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी दोन वेळा विचार करतात. मात्र, काहींना बर्फाळ पाण्यात पोहण्याचीही भीती वाटत नाही. अशाच ३० धाडसी लोकांनी ‘आइस किंग’ बनण्यासाठी म्युनिचजवळील बर्फाळ पाण्याच्या सरोवरात उड्या घेतल्या. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या सरोवरात दरवर्षी आइस किंग नावाची पोहण्याची स्पर्धा होते. यात भाग घेणाऱ्या लोकांना पोहण्याच्या विविध पद्धतींद्वारे ५० मीटर अंतर पार करावे लागते. ही स्पर्धा ज्या सरोवरात होते, त्याचे पाणी बोट बुडविले, तरी हुडहुडी भरावी एवढे थंड असते. त्यामुळे या स्पर्धेत फार फार तर चार-पाच लोक सहभागी होत असतील, असे तुम्हाला वाटेल, परंतु तसे नाही. या वर्षी ३० युवकांनी या स्पर्धेत भाग घेतला. विशेष म्हणजे, स्पर्धकांत महिलांचाही समावेश होता. स्थानिक युवक या स्पर्धेची वर्षभर वाट पहातात. स्पर्धक आगळेवेगळे पोषाख परिधान करून स्पर्धास्थळी येऊन मित्रांसह थंड पाण्याची मजा घेतात. ही स्पर्धा कमालीची लोकप्रिय आहे. ‘मी या स्पर्धेचा आनंद लुटला, असे मीर्को रोएव्हर या स्पर्धकाने सांगितले. बर्फाळ पाण्यात पोहणे ही आव्हानात्मक गोष्ट आहे. आपण हे का करतोय, असा प्रश्न पडतो

Web Title: Here was the competition for swimming in ice-water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.