हमासच्या हाती लागलं 'Chemical Weapons'; इस्रायलचा खळबळजनक दावा, किती धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 02:17 PM2023-10-23T14:17:23+5:302023-10-23T14:17:46+5:30

केमिकल वेपनवरून जगभरात दहशत माजवणारी संघटना अलकायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेनचा एक किस्सा प्रसिद्ध आहे.

Herzog confirms Israel found Hamas files with instructions for making chemical weapons | हमासच्या हाती लागलं 'Chemical Weapons'; इस्रायलचा खळबळजनक दावा, किती धोकादायक?

हमासच्या हाती लागलं 'Chemical Weapons'; इस्रायलचा खळबळजनक दावा, किती धोकादायक?

नवी दिल्ली - रॉकेट आणि हवाई हल्ल्यांनी सुरू झालेले इस्रायल-हमास युद्ध आता रासायनिक शस्त्रांच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे. हमासच्या ज्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबरला म्युझिक फेस्टिवलवर हल्ला केला होता. त्यांना केमिकल वेपन बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असा दावा इस्त्रायलचे राष्ट्रपती इसहाक हेर्जोग यांनी केला आहे. किबुत्जच्या म्युझिक फेस्टिवलमध्ये उघडपणे हत्याकांड करणारे काही दहशतवादी ठार झाले. त्यांच्या मृतदेहाच्या पडताळणीत काहींकडे केमिकल वेपन बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या साहित्यात सायनाइडचाही समावेश आहे.

इस्रायलच्या राष्ट्रपतींचा हा दावाही धक्कादायक आहे कारण इतिहासात कधीही दहशतवाद्यांकडे धोकादायक शस्त्रे सापडली आहेत तेव्हा मोठा विध्वंस झाला आहे. केमिकल वेपन बनवण्याचे जे साहित्य दहशतवाद्यांकडे सापडले आहे त्याचे कनेक्शन अल कायदाशी आहे. राष्ट्रपतींनी हा दावा सिद्ध करण्यासाठी अनेक कागदपत्रे माध्यमांसमोर दाखवली. पहिल्यांदाच दहशतवाद्यांच्या हाती केमिकल वेपन लागले आहे असं नाही. यापूर्वीही ISIS पासून अल कायदाने अनेकदा केमिकल वेपनचा वापर केला आहे.

लादेनवर त्याच्या कुत्र्यांवर केलेला वापर

केमिकल वेपनवरून जगभरात दहशत माजवणारी संघटना अलकायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेनचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. लादेनच्या मुलाने केमिकल वेपनबाबत सनसनाटी खुलासा केला. उमर लादेनने दावा केला होता की, त्याचे वडील लादेन लहानपणापासून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दहशतवादी ट्रेनिंग देत होते. उमरला बंदूक चालवण्याचेही ट्रेनिंग दिले गेले. इतकेच नाही तर लादेनने त्याच्या कुत्र्यांवर केमिकल वेपनचा वापर केला होता असंही त्याने सांगितले.

केमिकल वेपन कसं काम करतं?

कुठल्याही शस्त्रांमध्ये केमिकलचा वापर होतो आणि दारुगोळा एकप्रकारे केमिकलच आहे. परंतु ज्या केमिकल शस्त्राची गोष्ट होतेय ते वेगळे आहे. अशा केमिकल वेपनमध्ये गॅस अथवा लिक्विडचे भयानक मिश्रण असते. ज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची क्षमता असते. हे शस्त्र मनुष्य किंवा जनावरांना गंभीररित्या आजारी करते. त्यात अत्यंत क्रूरपणे त्याचा वापर करून लोकांचा तडफडून मृत्यू होतो.

पहिल्यांदा केमिकल शस्त्रांचा वापर पहिल्या जागतिक महायुद्धावेळी झाला होता. तेव्हा दोन्ही बाजूने गंभीर नुकसान घडवण्यासाठी श्वास गुदमरणाऱ्या क्लोरीन फॉस्जिन, त्वचेवर ज्वलन निर्माण होणारे मस्टर्ड गॅसचा वापर करण्यात आला होता. त्याकाळी या शस्त्रांच्या वापराने तब्बल १ लाखाहून अधिक मृत्यू झाले होते. संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टनुसार, आतापर्यंत केमिकल वेपनमुळे १० लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इस्त्रायल आणि हमास युद्धावेळी इस्त्रायलवर केमिकल वेपनचा वापर केल्याचा आरोप आहे. अलीकडेच पेलिस्टाईनने आरोप केला की, इस्त्रायलने त्यांच्या भागात सफेद फॉस्फोरस बॉम्ब डागला. हा बॉम्ब सफेद फॉस्फोरस आणि रबर यांच्या मिश्रणाने केला जातो. फॉस्फोरस मेणासारखे केमिकल असते. जे हळदीच्या रंगाचे असते. त्यातून लसणासारखा गंध येतो. हे केमिकल ऑक्सिजनच्या संपर्कात येताच आग पकडते. जी पाण्यानेही विझवता येणं कठीण आहे. हीच गोष्ट सर्वात खतरनाक आहे.

 

Web Title: Herzog confirms Israel found Hamas files with instructions for making chemical weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.