इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 19:14 IST2024-10-07T19:07:03+5:302024-10-07T19:14:58+5:30
इस्रायलच्या सीमेजवळ गाझा येथून हिज्बुल्ला आणि हमासच्या सैनिकांनी अनेक रॉकेट्स डागली

इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
Hezbollah and Hamas attacked Israel: इस्रायल गेल्या काही महिन्यांपासून विविध आघाड्यांवर लढत आहेत. तशातच हिज्बुल्ला आणि हमास यांनी मिळून सोमवारी इस्रायलला लक्ष्य केले. क्षेपणास्त्र आणि रॉकेटचा वापर करून झालेल्या हल्ल्यात १० जण जखमी झाले असून अनेक वाहने आणि इमारतींचे नुकसान झाले आहे. इस्रायलवर हमासच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. हमासने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की ते अजूनही इस्रायलविरुद्ध लढत आहेत. तेल अवीवच्या इस्रायलच्या सीमेजवळ गाझा येथून त्याच्या सैनिकांनी अनेक रॉकेट डागले. या हल्ल्यानंतर सायरन वाजू लागले आणि लोक बंकरच्या दिशेने धावताना दिसले.
इस्रायलचे तिसरे मोठे शहर हैफा येथे हिजबुल्लाने अनेक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स डागली. हैफाच्या दक्षिणेस असलेल्या इस्रायली लष्करी तळावर मध्यम पल्ल्याच्या फादी-1 क्षेपणास्त्रांनी मारा केल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, हैफा येथे दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि ६५ किलोमीटर दूर असलेल्या तिबेरियास शहरावर पाच रॉकेट्स पडली.
Several direct hits in Haifa from Hezbollah missiles pic.twitter.com/BSLAZzY8Jw
— Thomas MORE (@ThomaMore) October 6, 2024
याआधी इस्रायलने म्हटले होते की, आमच्या युद्ध विमानांनी बेरूतमधील हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयाशी संबंधित लक्ष्यांवर हल्ला केला आहे. या लक्ष्यांमध्ये गुप्तचर माहिती गोळा करणारी यंत्रणा, कमांड सेंटर आणि इतर अनेक इमारतींचा समावेश आहे. बेरूतमधील हिजबुल्लाह शस्त्रास्त्रांची दुकानेही नष्ट करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले.
इस्रायलसह जगभरात शोक पाळण्यात आला
सोमवारी हमासच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इस्रायलसह अनेक देशांमध्ये शोकसभांचे आयोजन करण्यात आले होते. इस्रायलमधील लोक स्मशानभूमीत आले आणि हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ स्मारकाच्या ठिकाणीही जमले. यावेळी अनेक जण आपल्या प्रियजनांची आठवण करून रडताना दिसले. हमासने ज्या लोकांना आतापर्यंत ओलीस ठेवल्याचा दावा केला होता, त्यांची सुटका करण्याची मागणीही करण्यात आली. युद्धात शहीद झालेल्या जवानांनाही मानवंदना देण्यात आली. त्याचबरोबर ब्रिटन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि ग्रीसमध्येही लोकांनी मोर्चे काढले.