हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 06:13 PM2024-09-28T18:13:28+5:302024-09-28T18:14:25+5:30

खामेनी यांनी लेबनॉनमधील निरपराध नागरिकांच्या हत्येचा निषेध करत, हा 'झायोनिस्टांच्या रानटीपणा'चा पुरावा असल्याचे म्हटले आहे.

hezbollah chief hassan nasrallah killed by idf Now Khamenei's tension increased; Flared on Israel and went underground! | हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!

हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!

इस्रायलने हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाहचा 'खात्मा' केल्याची घोषणा केली आहे. याच वेळी, इस्रायलसाठी जो कुणी धोकादायक असेल, त्याला सोडले जाणार नाही, असा इशाराही इस्रायलने दिला आहे. यावर, इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी एक निवेदन जारी करत, लेबनॉनवरील हल्ल्याने इस्रायलची क्रूरता उघड झाली आहे. इस्रायलने नि:शस्त्र नागरिकांना लक्ष्य केले आहे. इस्रायलचे हे धोरण मूर्खपणाचे आहे, असे म्हटले आहे. यानंतर खामेनेई यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

खामेनेई यांच्या सुरक्षेत वाढ - 
इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी म्हणाले आहे की, "गाझा युद्धापासून इस्रायलने कुठलाही धडा घेतलेला नाही. हिजबुल्लाच्या तुलनेत इस्रायल फार छोटा आहे. आम्ही लेबनॉनच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत." यानंतर, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. तसेच खामेनेई यांची सुरक्षितताही वाढवण्यात आली आहे.

खामेनी यांनी लेबनॉनमधील निरपराध नागरिकांच्या हत्येचा निषेध करत, हा 'झायोनिस्टांच्या रानटीपणा'चा पुरावा असल्याचे म्हटले आहे. तसेच, या घटनेने इस्रायली नेत्यांची अल्पदृष्टी आणि त्यांचे क्रूर धोरण जगासमोर उघड झाले असल्याचेही, ते म्हणाले. 

हवाई हल्ल्यात नसरल्लाहचा खात्मा, इस्रायलचा दावा - 
इस्रायली लष्कराचे प्रवक्ता लेफ्टनन्ट कर्नल नादाव शोशानी यांनी एक्सवर पोस्ट करत नसरल्लाहच्या खात्म्याची माहिती दिली आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डेव्हिड अव्राहम यांनी सांगितले की, "लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतमध्ये शुक्रवारी (27 सप्टेंबर 2024) करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुकाचा खात्मा झाला आहे. हसन नसराल्लाहला मारण्यासाठी ऑपरेशन NEW ORDER राबवण्यात आले होते." एवढेच नाही तर, जो कुणी इस्रायलला धमकी देईल, त्याच्यापर्यंत कसे पोहोचायचे हे आम्हाला माहीत आहे, असेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे. टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, त्यांनी काल हिजुबल्लाहच्या हेडक्वार्टरवर हल्ला केला होता. तेथे हसन नसरल्लाह देखील उपस्थित होता. इस्रायली सैनिक बेरूतसह विविध भागांत सातत्याने हल्ला करत आहे. 

नसराल्लाहची मुलगी जैनबचाही मृत्यू -
इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नसराल्लाहशिवाय त्यांची मुलगी जैनबचाही या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इस्रायलने हल्ला केलेल्या कमांडर सेंटरमध्ये नसरल्लाहच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. यापूर्वी शुक्रवारी रात्री इस्रायलने हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागले होते, ज्यात 6 जणांचा खात्मा झाला होता, तर 90 जण जखमी झाले होते.

Web Title: hezbollah chief hassan nasrallah killed by idf Now Khamenei's tension increased; Flared on Israel and went underground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.