हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 08:00 AM2024-10-14T08:00:23+5:302024-10-14T08:03:51+5:30
लेबनॉन समर्थित हिजबुल्लाह दहशतवादी या संघटनेने इस्रायलला जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर भीषण हल्ला केला आहे. यामध्ये चार सैनिकांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक सैनिक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त येत आहे.
लेबनॉन समर्थित हिजबुल्लाह दहशतवादी या संघटनेने इस्रायलला जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने पेजर, वॉकीटॉकी अॅटॅक करून हिजबुल्लाचे नेटवर्क मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. तो बऱ्यापैकी यशस्वी ठरला होता. यानंतर हिजबुल्लाहच्या प्रमुखालाही मारण्यात इस्रायल यशस्वी ठरला होता. आता हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
नुकत्याच केलेल्या हल्ल्यात सुसाईड ड्रोन आणि मिसाईलचा वापर करण्यात आला आहे. इस्रायलच्या बिन्यामिनामध्ये लष्करी तळावर हा हल्ला करण्यात आला. यामध्ये चार सैनिक मारले गेले आहेत. तर ६७ जण जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
इस्रायलच्या हैफा शहराला लक्ष्य करत सुमारे 25 रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हल्ल्यापूर्वी कोणताही इशारा देणारा सायरन वाजला नव्हता, असे तेथील वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. रविवारी रात्री उत्तर इस्रायलमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत होते.