हॉटेलमधील ८०० कपल्सचे खाजगी क्षण कॅमेरात कैद, लाइव्ह स्ट्रीमिंग करून कमवत होते लाखो रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 05:12 PM2019-03-25T17:12:57+5:302019-03-25T17:18:55+5:30

लोक जेव्हा बाहेर कुठे फिरायला जातात तेव्हा राहण्यासाठी कमी पैशात एका ठीकठाक हॉटेलची निवड करतात. पण अनेकदा अशा काही हॉटेल्सच्या रूम्समध्ये छुपे कॅमेरे लावले जातात आणि लोकांचे खाजगी क्षण शूट केले जातात.

Hidden camera found in hotels room 800 couples secretly filmed in south korea 4 accused arrested | हॉटेलमधील ८०० कपल्सचे खाजगी क्षण कॅमेरात कैद, लाइव्ह स्ट्रीमिंग करून कमवत होते लाखो रूपये!

हॉटेलमधील ८०० कपल्सचे खाजगी क्षण कॅमेरात कैद, लाइव्ह स्ट्रीमिंग करून कमवत होते लाखो रूपये!

googlenewsNext

लोक जेव्हा बाहेर कुठे फिरायला जातात तेव्हा राहण्यासाठी कमी पैशात एका ठीकठाक हॉटेलची निवड करतात. पण अनेकदा अशा काही हॉटेल्सच्या रूम्समध्ये छुपे कॅमेरे लावले जातात आणि लोकांचे खाजगी क्षण शूट केले जातात. नंतर हे व्हिडीओ विकून लाखो रूपये कमावले जातात. ही समस्या अलिकडे फार जास्त सर्रासपणे बघायला मिळत असून त्यामुळे हॉटेल्समध्ये राहताना फारच काळजी घ्यावी लागते.  

नुकतंच असं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. साउथ कोरियाची राजधानी सियोलमध्ये मोठ्या प्रमाणात कपल्सच्या खाजगी क्षणांचे व्हिडीओ तयार करण्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सीएनएन डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार इथे काही हॉटेलच्या ४२ रूम्समध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आले होते आणि त्यात शेकडो कपल्सचं रेकॉर्डिंग करण्यात आलं.  

(Image Credit : scmp.com)

असे सांगितले जात आहे की, रूम्समध्ये लावण्यात आलेल्या या छुप्या कॅमेराने केवळ व्हिडीओच तयार केले असं नाही तर यांचं इंटरनेटवर लाइव्हस्ट्रीमिंगही करण्यात आलं. साऊथ कोरियातील ही अशाप्रकारची सर्वात मोठी घटना मानली जात आहे. या हॉटेल्सच्या हेअरड्रायर होल्डर, वॉल सॉकेट आणि डिजिटल टीव्ही बॉक्समध्ये कॅमेरे फिट करण्यात आले होते आणि त्यात रेकॉर्डिंग करून व्हिडीओ विकले गेले. 

(Image Credit : Social Media)

असेही सांगितले जात आहे की, मोल्का नावाच्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त पुरूष आहेत. आणि ते लपून महिलांच्या खाजगी क्षणांचे फोटो-व्हिडीओ काढत आहेत. नंतर या गोष्टी ते इंटरनेटवर व्हायरल करत आहेत. हे लोक महिला शौचालये, गर्ल्स स्कूलच्या टॉयलेटमध्ये आणि इतरही काही ठिकाणांवर कॅमेरे लावत आहेत. 

(Image Credit : aljazeera.com)

मोटल नावाच्या हॉटेलमधील ४२ रूम्समध्ये हे छुपे कॅमेरे लावण्यात आले होते. १० शहरातील हॉटेल्समध्ये हे कॅमेरे आढळले. रिपोर्ट्सनुसार, ज्या वेबसाइट्सवरून हे व्हिडीओ लाइव्ह करण्यात आले होते त्या वेबसाइटला साधारण ४ हजार लोकांनी सब्सक्राइब केलं होतं. असे लाइव्हस्ट्रीमिंग बघणाऱ्या यूजर्सना ४४ डॉलर म्हणजे साधारण ३ हजार रूपये महिन्याचा चार्ज द्यावा लागतो.  

पोलिसांनी सांगितले की, वेबसाइटकडे जे व्हिडीओ मिळाले आहेत ज्यावरून हे समोर आलं की, ८०० कपल्सचे व्हिडीओ तयार करण्यात आले होते. सध्या या प्रकरणी पोलिसांनी ४ लोकांना अटक केली आहे.  

 

Web Title: Hidden camera found in hotels room 800 couples secretly filmed in south korea 4 accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.