इस्त्रायलमध्ये हाय अलर्ट! सत्तांतरावेळी अमेरिकेसारख्या हिंसाचाराची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 08:00 PM2021-06-06T20:00:34+5:302021-06-06T20:02:17+5:30

Israel domestic security warns of violence: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांचे सरकार 12 वर्षांनी सत्तेतून पायउतार होण्याची शक्यता आहे.

High alert in Israel! Possibility of violence like America during Netanyahu lost and new government form | इस्त्रायलमध्ये हाय अलर्ट! सत्तांतरावेळी अमेरिकेसारख्या हिंसाचाराची शक्यता

इस्त्रायलमध्ये हाय अलर्ट! सत्तांतरावेळी अमेरिकेसारख्या हिंसाचाराची शक्यता

googlenewsNext

Israel Political Crisis: इस्त्रायलमध्ये (Israel) मोठे सत्तांतर होणार आहे. तिथे आठ विरोधी पक्षांचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. या आघाडीने देशात सरकार बनविण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पायऊतार होत असताना जशी हिंसा झाली, तसाच मोठा हिंसाचार (violence) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (head of Israel’s domestic security service issued a rare warning on Saturday of possible violence)

Benjamin Netanyahu: इस्त्रायलमध्ये नेतन्याहू युगाचा अस्त; सात सदस्य असलेले नेफ्टाली बेनेट नवे पंतप्रधान होणार


इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांचे सरकार 12 वर्षांनी सत्तेतून पायउतार होण्याची शक्यता आहे. नेतन्याहू यांना 2 जूनपर्यंत सत्ता स्थापन करण्याची संधी देशाच्या अध्यक्षांनी दिली होती. मात्र, नेतन्याहू बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले. सात खासदारांचा पाठिंबा असलेले नेफ्टाली बेनेट हे नवे पंतप्रधान बनण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदा मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. गेल्या वर्षीच्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती होती. यामुळे नेतन्याहू हे काळजीवाहू पंतप्रधान होते. नेतन्याहू यांच्या पक्षाला दोन नंबरच्या जागा मिळाल्या होत्या. तरी देखील इस्त्रायलचे अध्यक्ष रुवेन रिवलिन यांनी नेतन्याहू यांना सरकार बनविण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 जूनपर्यंतचा वेळ दिला होता.  


विरोधी पक्ष नेते येर लेपिड यांनी इस्त्रायलमध्ये विरोधी पक्षांमध्ये सरकार बनविण्यासाठी सहमती बनल्याचे जाहीर केले. या नव्या आघाडीमध्ये आठ पक्ष सहभागी आहेत. या साऱ्यांच्या सहमतीनुसार सामिना पक्षाचे नेते नेफ्टाली बेनेट इस्त्रायलचे पंतप्रधान होणार आहेत. त्यांचा कालावधी हा दोन वर्षांचाच असणार असून यानंतर येश एटिड पक्षाचे नेते येर लेपिड त्यानंतर पंतप्रधान होणार आहेत. 


इस्त्रायलच्या सुरक्षा यंत्रणेचा इशारा
इस्त्रायलची अंतर्गत सुरक्षा एजन्सी शिन बेटने हा इशारा दिला आहे. देशात नवीन सरकार स्थापन होण्य़ाआधी हिंसा होऊ शकते. मीडिया रिपोर्टमध्ये देखील अशीच शक्यता वर्तविण्यात आली होती. शिन बेटचे प्रमुख नदाव अर्गामान यांनी याची माहिती दिली आहे. 
सोशल मीडियावर खूपच हिंसक पोस्ट केल्या जात आहेत. याद्वारे लोकांना उकसविले जात आहे. यामुळे काही गटांमध्ये हिंसा भडकू शकते, असे ते म्हणाले. 


दुसरीकडे बेंजामिन नेतन्याहू हे या नव्या आघाडीविरोधात बोलत आहेत. त्यांनी ही आघाडी देशासाठी धोक्याची असल्याचे म्हटले आहे. तसेच खासदारांनी या आघाडीसोबत जाऊ नये, असे आवाहन करत आहेत. 

Web Title: High alert in Israel! Possibility of violence like America during Netanyahu lost and new government form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.