उंचावरील दोरीवर चालण्याचा विक्रम

By admin | Published: November 4, 2014 02:15 AM2014-11-04T02:15:18+5:302014-11-04T02:15:18+5:30

अमेरिकेतील निक वालेंदा (३५) या तरुणाने दोन गगनचुंबी इमारतीवरुन डोळे बांधून सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता चालण्याचा विक्रम केला

High rolling record | उंचावरील दोरीवर चालण्याचा विक्रम

उंचावरील दोरीवर चालण्याचा विक्रम

Next

शिकागो : अमेरिकेतील निक वालेंदा (३५) या तरुणाने दोन गगनचुंबी इमारतीवरुन डोळे बांधून सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता चालण्याचा विक्रम केला असून, त्याचे हे साहस व थरार पाहण्यास हजारो लोक जमले होते. सुरक्षा जाळे न लावता दोन इमारतीमध्ये दोरी बांधून डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे त्याने दोरीवरुन चालण्याचा उपक्रम केला. अत्यंत धाडसाने हा उपक्रम रविवारी रात्री पार पाडल्यानंतर आपल्याला विलक्षण आनंद झाला आहे असे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले.
हाय वायर आर्टिस्ट म्हणून निक वालेंदा प्रसिद्ध आहे. त्याने शिकागो नदी ताणलेल्या दोरीवरुन ६.५२ मिनिटात पार केली. शिकागोमधील मरिना सिटी टॉवर्समध्ये दोरी बांधून त्याने हा थरार पूर्ण केला.
उंचावर बांधलेल्या दोरीवरुन चालणे हा वालेंदा कुटुंबियाचा हा कौटुंबिक व्यवसाय आहे. त्याचे वडील, आजोबा हाच व्यवसाय करत असत. त्याचे पणजोबा कार्ल यांचे असेच साहस करताना दोरीवरुन पडून १९७८ साली निधन झाले आहे.
मरीना सिटी टॉवर्सच्या पश्चिमेकडील टॉवरवरुन १३८ फुटांवर नदीच्या दुसऱ्या बाजुला दुसऱ्या इमारतीला २८ मीटर उंचीवर दोरी बांधण्यात आली होती. थंडगार , बोचरे वारे वाहात होते. आय लव्ह शिकागो, अँड शिकागो डेफिनेटली लव्हज् मी असे तो दोरीवरुन चालताना म्हणत होता.खाली उभा असलेला जमाव त्याला पुढे जाण्यासाठी समर्थनाच्या घोषणा देत होता. १.१७ मिनिटांत त्याने दोन इमारतीमधील अंतर पार केले, तर शिकागो नदीची लांबी ६ .५२ मिनिटात पूर्ण केली. (वृत्तसंस्था)

Web Title: High rolling record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.