विमान अपहरणकर्त्यांनी माल्टामध्ये मागितला आश्रय

By admin | Published: December 23, 2016 08:38 PM2016-12-23T20:38:55+5:302016-12-23T20:42:29+5:30

लिबियाच्या प्रवासी विमानाच्या अपहरणकर्त्यांनी सर्व प्रवाशांसह क्रू सदस्यांची सुटका केली आहे.

The hijackers asked for flight hijackers in Malta | विमान अपहरणकर्त्यांनी माल्टामध्ये मागितला आश्रय

विमान अपहरणकर्त्यांनी माल्टामध्ये मागितला आश्रय

Next

ऑनलाइन लोकमत

वालेटा, दि. 23 - लिबियाच्या प्रवासी विमानाच्या अपहरणकर्त्यांनी सर्व प्रवाशांसह क्रू सदस्यांची सुटका केली आहे. आफ्रिकिया एअरलाईन्सच्या एअरबस ए 320 विमानात एकूण 118 जण होते. सर्वांची सुटका केल्यानंतर माल्टाच्या सुरक्षा पथकांसमोर अपहरणकर्त्यांनी आत्मसमर्पण केले. 
 
मुअमर गद्दाफीचे समर्थक असल्याचा दावा करणा-या अपहरणकर्त्यांनी माल्टामध्ये आश्रय मागितला आहे. आश्रय मिळावा यासाठी त्यांच्या वाटाघाटी सुरु होत्या. आधी त्यांनी त्यांच्याकडे असणा-या ग्रेनेडनी विमान उडवण्याची धमकी दिली होती. 
 
शुक्रवारी सकाळी दक्षिण लिबीयातील सीबहा येथून विमानाने त्रिपोलीसाठी उड्डाण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी विमानाचा ताबा घेऊन हे विमान माल्टा येथे उतरवण्यास भाग पाडले. 
 

Web Title: The hijackers asked for flight hijackers in Malta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.