हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा आले आमने सामने
By admin | Published: September 27, 2016 07:46 AM2016-09-27T07:46:35+5:302016-09-27T11:33:59+5:30
अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार असलेले डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज पहिली जाहीर चर्चा पार पडली
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 27 - अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिली चर्चा आज पार पडली. या चर्चेदरम्यान दोघांनी एकमेकांवर निशाणा साधत आरोप - प्रत्यारोप केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल्सचा मुद्दा पुन्हा उपस्थित केलं तर दुसरीकडे हिलरी क्लिंटन यांनीदेखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. या चर्चेच्या तीन फे-या पार पडणार आहेत.
टॉस जिंकल्यानंतर मॉडरेटरने हिलरी क्लिंटन यांना पहिला प्रश्न विचारला. अमेरिकेतील कामगारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी काय योजना आखण्यात आली आहे ? असा सवाल विचारण्यात आला. ट्रम्प यांनीदेखील याच मुद्यावर जाहीर चर्चेला सुरुवात करत मेक्सिको आणि अन्य देश आपल्या नोक-या पळवत असल्याचा आरोप केला.
हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरसीची लढत होण्याची शक्यता असल्याने ही चर्चा अत्यंत महत्वाची होती. 8 नोव्हेंबर रोजी होणा-या मतदानाच्या सहा आठवड्याअगोदर आयोजित करण्यात आलेल्या या चर्चेमुळे मतदारांचं पारडं एका कोणाच्या बाजूला झुकण्याची शक्यता आहे.
हिलरी क्लिंटन यांच्या टॅक्स रिटन्सच्या प्रश्नाचे उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटनच्या ई-मेल प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, हिलरी यांनी या चर्चेदरम्यान वैयक्तिक ई-मेलचा वापर करणं ही आपली चूक असल्याचं मान्य केलं. यावर ट्रम्प यांनी आपण आपले आयकर रिटन्सचं विवरण सादर करण्यास तयार आहोत, त्या बदल्यात हिलरी क्लिंटन यांनी डिलिट केलेले ते 33 हजार ई-मेल सार्वजानिक करावेत अशी मागणी केली.
चर्चेतील महत्वाचे मुद्दे -
- आम्ही सर्व कंपन्यावर लावण्यात आलेला टॅक्स कमी करणार, म्हणजेच सध्या ३५ टक्के असलेला टॅक्स १५ टक्यांपर्यंत करु - डोनाल्ड ट्रम्प
- उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे, त्यासाठी त्यांना कर्जाची सोय करणार - हिलरी क्लिंटन
- इसिस या दहशतवादी संघटनेशी लढण्याचा प्लॅन आखला आहे, तुम्ही काय केले ?- हिलेरी क्लिंटन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना सवाल
- मला वाटते माझ्या पतीने 90च्या दशकात चांगले काम केले - हिलरी क्लिंटन
- अमेरिकेत उर्जा पॉलिसी धोक्यात आहेत - डोनाल्ड ट्रम्प
- अमेरिकेतून चोरी होणा-या नोक-या आम्ही थांबविल्या पाहिजेत - डोनाल्ड ट्रम्प
- राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आठ वर्षात अमेरिकेचे कर्ज दुप्पट केले - डोनाल्ड ट्रम्प
- फेडरल रिझर्व्ह आपले काम करत नसून राजकारण करत आहे - डोनाल्ड ट्रम्प
- आम्ही आणखी १० दशलक्ष नोक-या उपलब्ध करुन देणार - हिलरी क्लिंटन
- हिलरी क्लिंटन हा फक्त बोलणा-या नेत्या आहेत, काही काम नाही करणार - डोनाल्ड ट्रम्प
- डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार बराक ओबामा यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला - हिलरी क्लिंटन
- हिलरी क्लिंटन यांनी आपल्या ईमेल्सची माहिती द्यावी त्यानंतर मी टॅक्स रिटर्न्स जाहीर करेन - डोनाल्ड ट्रम्प
- वैयक्तिक ई-मेलचा वापर करुन मी चूक केली असून याची संपूर्ण जबाबदारी मी घेते- हिलरी क्लिंटन
- ज्यांच्याकडे बंदूक असण्याची गरज नाही त्यांच्याकडून काढून घेण्याची गरज - हिलरी क्लिंटन
- सायबर युद्द आपल्यासाठी सर्वात आव्हान - हिलरी क्लिंटन
- डोनाल्ड ट्रम्प यांनी कृष्णवर्णीयांबद्दल जी भुमिका मांडली ती दुर्देवी - हिलरी क्लिंटन
- इंटरनेटवर इसीस आपल्याला मागे टाकत आपला पराभव करत आहे - डोनाल्ड ट्रम्प
- बराक ओबामा यांच्याकडे जन्मदाखला मागून मी देशाच्या भल्याचं काम केलं - डोनाल्ड ट्रम्प
- इराकमधून बाहेर पडण्याचा निर्णय जॉर्ज बुश यांचा होता - हिलरी क्लिंटन
- ट्रम्प यांनी वारंवार मुस्लिमांचा अपमान केला - हिलरी क्लिंटन
- हिलरी यांच्याकडे अनुभव आहे मात्र तो वाईट अनुभव, हिताचे कोणतेच निर्णय त्यांनी घेतले नाहीत, त्या अनुभवाची देशाला गरज नाही - डोनाल्ड ट्रम्प
- डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांचा अपमान केला आहे - हिलरी क्लिंटन
- हिलरी क्लिंटन जिंकल्यास माझं समर्थन - डोनाल्ड ट्रम्प