हिलरी क्लिंटन यांची ११ तास चौकशी

By Admin | Published: October 24, 2015 03:04 AM2015-10-24T03:04:23+5:302015-10-24T03:04:23+5:30

लिबियातील बेन्गाझी या शहरात २०१२ साली अमेरिकन वकिलातीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी रोडहॅम क्लिंटन यांची सिलेक्ट समिटीसमोर सलग अकरा

Hillary Clinton's 11-hour inquiry | हिलरी क्लिंटन यांची ११ तास चौकशी

हिलरी क्लिंटन यांची ११ तास चौकशी

googlenewsNext

लिबियातील बेन्गाझी या शहरात २०१२ साली अमेरिकन वकिलातीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी रोडहॅम क्लिंटन यांची सिलेक्ट समिटीसमोर सलग अकरा तास चौकशी झाली.
या हल्ल्याच्या वेळेस आपण परिस्थिती कशी हाताळली याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले. या हल्ल्यात अमेरिकेचे लिबियातील राजदूत ख्रिस स्टीव्हन्स व तीन अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यांनी संरक्षणाच्या वारंवार केलेल्या मागणीबद्दलही यावेळेस प्रश्न विचारण्यात आले.
क्लिंटन पुढील वर्षी होणारी अध्यक्षपदाची निवडणूक लढवू इच्छितात. त्यांची प्रतिमा मलिन व्हावी यासाठीच रिपब्लिकन्स समितीच्या चौकशीद्वारे प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या पक्षाने म्हटले आहे.
१७ महिने चाललेल्या या चौकशी प्रक्रियेसाठी ४.७ दशलक्ष डॉलर्स खर्च झाल्याचे सांगण्यात येते. कालच्या चौकशीत हिलरी यांनी सडेतोड भूमिका घेतल्यामुळे त्यांची प्रतिमा उंचावेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Hillary Clinton's 11-hour inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.