हिंदू व्यक्तीही अमेरिकेची अध्यक्ष होऊ शकेल - ओबामा
By admin | Published: January 20, 2017 06:03 AM2017-01-20T06:03:19+5:302017-01-20T06:03:19+5:30
भविष्यात एक महिला, एक हिंदू, यहुदी आणि एखादी लॅटिन व्यक्तीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकते
वॉशिंग्टन : भविष्यात एक महिला, एक हिंदू, यहुदी आणि एखादी लॅटिन व्यक्तीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेतील वांशिक वैविध्यतेचे सामर्थ्य अधोरेखित केले. जाती, पंथ, वंश आणि धर्माचा अभिनिवेश न बाळगता पुढे येणारी कोणतीही गुणवान व्यक्ती हीच अमेरिकेची ताकद आहे, असे सांगत त्यांनी ‘सर्वांना समान संधी’ या धोरणाचा पुरस्कार केला. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून व्हाईट हॉऊसमधील शेवटच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मोदींचे मानले आभार
भारत आणि अमेरिकादरम्यानचे संबंध अधिक दृढ करणाऱ्या सहकार्यपूर्ण भागीदारासाठी बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवर्जून फोन करून धन्यवाद दिले. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध भक्कम करण्याकामी दिलेल्या योगदानाबद्दल मोदी यांनीही ओबामा यांचे आभार मानले. २०१५ मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाल्याची आठवण ताजी करीत ओबामा यांनी येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. (वृत्तसंस्था)
>सर्व ठीक होईल
अध्यक्ष म्हणून निरोप घेण्याआधी ओबामा यांनी अमेरिकी जनतेला सर्व काही ठीक होईल, अशा शब्दांत भरवसा दिला. सर्व काही नीट व्हावे, यासाठी काम करावे लागेल. संघर्ष करावा लागेल. भेदभाव, मतदानाचा हक्क रद्द करणे, माध्यमांच्या स्वातंत्र्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास मी जोरदार आवाज उठवेन