"तालिबानने मारले तरी बेहत्तर, पण देव आणि मंदिर सोडणार नाही"; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 02:26 PM2021-08-17T14:26:43+5:302021-08-17T14:27:59+5:30

Afghanistan-Taliban Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अंमल सुरू झाल्यापासून देशभरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अफगाणिस्तानमध्ये नगण्य असलेल्या हिंदू आणि शीख समुदायासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

A Hindu priest at a temple in Kabul refuses to leave Afghanistan | "तालिबानने मारले तरी बेहत्तर, पण देव आणि मंदिर सोडणार नाही"; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार

"तालिबानने मारले तरी बेहत्तर, पण देव आणि मंदिर सोडणार नाही"; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार

Next

काबुल - तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील अश्रफ घनी सरकारला पळवून लावत देशातील सत्तासुत्रे आपल्या ताब्यात घेतली आहे. अफगाणिस्तानमध्येतालिबानी अंमल सुरू झाल्यापासून देशभरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. (Afghanistan-Taliban Crisis) विदेशी नागरिकांबरोबरच अनेक अफगाणी नागरिकही देश सोडून जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर अफगाणिस्तानमध्ये नगण्य असलेल्या हिंदू आणि शीख समुदायासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अशा परिस्थितीतही एक व्यक्ती अशी आहे, जिने आपले कर्तव्य सोडून पळून न जाण्याचा निर्णय घेतला आहे. (A Hindu priest at a temple in Kabul refuses to leave Afghanistan)

ही व्यक्ती आहे, अफगाणिस्तानमधील रतननाथ मंदिरातील पुजारी पंडित राजेश कुमार. त्यांनी मंदिर सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यादरम्यान, तालिबानच्या हातून आपला मृत्यू झाल्यास ती मी माझी सेवा समजेन, असे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलवर तालिबानचा कब्जा झाल्यानंतर अफगाणिस्तान सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अमेरिकन सैन्याच्या माघारीबरोबर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीपासूनच लोकांनी देश सोडण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, इतर लोकांप्रमाणेच राजेश कुमार यांनाही काबुल सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक हिंदूंनी त्यांचा प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले होते. याबाबत माहिती देताना भारद्वाज यांनी सांगितले की, काबुलमध्ये रतननाथ मंदिराचे पुजारी पंडित राजेश कुमार यांनी सांगितले की, काही दिंदूंनी मला काबुल सोडण्याचे आवाहन केले होते. तसेच माझ्या राहण्याच्या आणि प्रवासाची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र माझ्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपासून या मंदिरात सेवा केली आहे. मी हे मंदिर सोडून जाणार नाही. जर तालिबानने मला मारले तरी ती मी माझी सेवा समजेन.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, भारत अफगाणिस्तानमधील लहान शीख आणि हिंदू समुदायाला भारतात येण्यासाठी मदत केली जाईल. आम्ही अफगाण, शीख आणि हिंदू समुदायाच्या प्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात आहोत. आम्ही त्यांना भारतात परतण्यासाठी मदत करू. तत्पूर्वी अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासाकडून भारतीय नागरिकांना चार अॅडव्हायजरी जारी करण्यात आल्या होत्या.  

Read in English

Web Title: A Hindu priest at a temple in Kabul refuses to leave Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.