हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:02 PM2024-12-04T22:02:54+5:302024-12-04T22:03:42+5:30

मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांना बांग्लादेशच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे.

Hindus were not attacked; Bangladesh Prime Minister Mohammed Yunus says | हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा

हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा

Bangladesh : बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर तेतील हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. दरम्यान, बांग्लादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य मोहम्मद युनूस यांनी एका मुलाखतीत हिंदूंवरील हल्ले अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी शेख हसीना यांच्यावर बांग्लादेशला उद्धवस्त केल्याचा आरोपही केला आहे. शेख हसीना यांच्या सरकारला त्यांनी फॅसिस्ट सरकार म्हटले.

निक्की एशियाला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद युनूस म्हणाले की, परिस्थिती सुधारल्यानंतरच देशात निवडणुका घेतल्या जातील. निवडणुका घेण्यापूर्वी अर्थव्यवस्था, प्रशासन, नोकरशाही आणि न्यायपालिकेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे युनूस म्हणाले. तसेच, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणातील खटला संपल्यानंतर भारताने शेख हसीना यांना बांग्लादेशच्या स्वाधीन करावे, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. 

हिंदूंवरील हल्ल्यांबाबत अपप्रचार
बांग्लादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांना त्यांनी अपप्रचार म्हटले. भारत सरकार हिंदूंच्या सुरक्षेबाबत जी चिंता व्यक्त करत आहे, ती वस्तुस्थितीवर आधारित नाही. जे काही बोलले जात आहे, ते फक्त 'अप्रचार' आहे, अशी प्रतिक्रिया मोहम्मद युनूस यांनी दिली.

बांग्लादेशात सत्तांतर
शेख हसीना यांचे सरकार याच वर्षी 5 ऑगस्ट रोजी उलथून टाकण्यात आले. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन त्या भारतात पळून आल्या. हसीना सरकार गेल्यापासून भारत आणि बांग्लादेशमधील संबंध बिघडले आहेत. बांग्लादेशातही हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. अलीकडेच हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर संबंध आणखी चिघलले आहेत. चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, त्यांना जामीन मिळण्यातही अडचणी आणल्या जात आहेत.

 

Web Title: Hindus were not attacked; Bangladesh Prime Minister Mohammed Yunus says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.