बेपत्ता विमानाचे शेपूट हाती

By admin | Published: January 11, 2015 12:22 AM2015-01-11T00:22:55+5:302015-01-11T00:22:55+5:30

एअर आशिया जेट विमानाचे शेपूट शनिवारी क्रेन आणि बलून्सच्या साह्याने वर काढण्यात आले. २८ डिसेंबर रोजी अपघात होऊन हे विमान खवळलेल्या समुद्रात बुडाले होते.

Hire the tail of a missing plane | बेपत्ता विमानाचे शेपूट हाती

बेपत्ता विमानाचे शेपूट हाती

Next

जकार्ता/सिंगापूर : जावाच्या समुद्रातून एअर आशिया जेट विमानाचे शेपूट शनिवारी क्रेन आणि बलून्सच्या साह्याने वर काढण्यात आले. २८ डिसेंबर रोजी अपघात होऊन हे विमान खवळलेल्या समुद्रात बुडाले होते. आता महत्त्वाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध लागायचा आहे.
ब्लॅक बॉक्समधून ध्वनिसंकेत मिळाल्यानंतर विमानाच्या शेपटाचा भाग मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. या भागात ब्लॅक बॉक्स असतो. इंडोनेशियाच्या शोध व बचाव पथकांनी एअरबस ए ३२०-२००च्या मागचा भाग साधारण ३० मीटर खोलीतून बलून्स आणि क्रेनच्या साह्याने वर उचलून बचाव जहाजावर आणला; परंतु या भागात ब्लॅक बॉक्स आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. या विमानाचे अवशेष शोधण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न चालविले होते. विमानाच्या सापडलेल्या अवशेषांपैकी शेपूट हा सर्वात मोठा भाग आहे.

Web Title: Hire the tail of a missing plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.