हिटलरने दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या टेलिफोनचा 2 लाख 43 हजार डॉलरमध्ये लिलाव

By admin | Published: February 20, 2017 02:00 PM2017-02-20T14:00:21+5:302017-02-20T14:47:07+5:30

दुस-या महायुद्धात ज्या टेलिफोनवरुन अॅडॉल्फ हिटलरने लाखो लोकांच्या हत्येचा आदेश दिला होता, त्या टेलिफोनचा नुकताच लिलाव करण्यात आला

Hitler earmarked $ 2, 43, 000 of telephone used for World War II | हिटलरने दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या टेलिफोनचा 2 लाख 43 हजार डॉलरमध्ये लिलाव

हिटलरने दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या टेलिफोनचा 2 लाख 43 हजार डॉलरमध्ये लिलाव

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 20 - दुस-या महायुद्धात ज्या टेलिफोनवरुन अॅडॉल्फ हिटलरने लाखो लोकांच्या हत्येचा आदेश दिला होता, त्या टेलिफोनचा नुकताच लिलाव करण्यात आला. अमेरिकेत पार पडलेल्या या लिलवात अॅडॉल्फ हिटलरच्या या टेलिफोनचा 2 लाख 43 हजार डॉलरना (1 कोटी 60 लाख 83 हजार 6000 रुपये) लिलाव झाला. 1945 मध्ये दुस-या महायुद्धात हिटलरचा पराभव केल्यानंतर बर्लिनमधील एका बंकरमध्ये हा टेलिफोन मिळाला होता.
 
या लिलावाचं आयोजन करणा-या 'अलेक्झेंडर हिस्टोरिकल ऑक्शन'ने टेलिफोनसाठी दोन ते तीन लाख डॉलरचा अंदाज बांधला होता. याची सुरुवातीची बोली एक लाख डॉलर ठेवण्यात आली होती.  'अलेक्झेंडर हिस्टोरिकल ऑक्शन'ने हा टेलिफोन विकत घेणा-याचं नाव मात्र जाहीर केलेलं नाही. लिलावातील विजेत्यांनी टेलिफोनच्या माध्यमातूनच बोली लावली होती.
बॅकलाईटपासून बनलेल्या काळ्या रंगाच्या टेलिफोनला नंतरच्या काळात गडद लाल रंगाने रंगवण्यात आले होते. शिवाय, टेलिफोनवर 'हिटलर' असं नावही कोरण्यात आले. मेरीलँडच्या कंपनीने टेलिफोनसोबत अनेक वस्तूंचा लिलाव केला. यामध्ये चिनी मातीपासून बनलेल्या अल्सेशियन कुत्र्याच्या शिल्पाचाही समावेश आहे. या शिल्पाचा 24 हजार 300 डॉलरना लिलाव झाला. 

Web Title: Hitler earmarked $ 2, 43, 000 of telephone used for World War II

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.