हॉलिवूड अभिनेता रायन ग्रँथमने केली आईची हत्या केली, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 04:25 PM2022-09-23T16:25:07+5:302022-09-23T16:25:55+5:30
आईच्या हत्येनंतर रायन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या हतेया कट रचत होता.
'रिव्हरडेल' आणि 'डायरी ऑफ अ विम्पी किड' या हॉलिवूड चित्रपटात काम केलेला अभिनेता रायन ग्रँथमला (Ryan Grantham) त्याच्या आईच्या हत्येप्रकरणी 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या 14 वर्षात त्याला कोणताही पॅरोलदेखील मिळणार नाही. 21 सप्टेंबर रोजी, व्हँकुव्हरमधील ब्रिटिश कोलंबिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कॅथलीन केर यांनी ही शिक्षा सुनावली.
लिओ अवॉर्ड्ससाठी नामांकित रायन ग्रँथमने 31 मार्च 2020 रोजी व्हँकुव्हरमध्ये घरातच 64 वर्षीय आई बार्बरा व्हाईटची डोक्यात गोळी घालून हत्या केली होती. या हत्येनंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पणदेखील केले होते. त्याच्यावर सेकंड-डिग्री हत्येचा आरोप आहे, ज्यामध्ये पॅरोलशिवाय 10 ते 25 वर्षांची शिक्षेची तरतूद आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांना मारण्याची योजना होती
विशेष म्हणजे, आईच्या हत्येनंतर रायनने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचीही हत्या करण्याची योजना आखली होती. रायनच्या गाडीत पोलिसांना तीन बंदुका, मोलोटोव्ह कॉकटेल, दारूगोळा, कॅम्पिंगचे सामान आणि ओटावाचा नकाशा सापडला. पंतप्रधानांचे कुटुंब रिडो कॉटेजमध्ये राहते. रायनने आपल्या डायरीत याबद्दल लिहिले होते. मात्र, त्याने आईच्या हत्येनंतर स्वत:ला व्हँकुव्हर पोलिसांच्या स्वाधीन केले.