Nirav Modi : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्र्यांची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 01:00 IST2021-04-17T00:59:49+5:302021-04-17T01:00:07+5:30
Nirav Modi : नीरज मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र गृहमंत्र्यांना घेतलेल्या या निर्णयाविरोधात नीरव मोदीला १४ दिवसात तेथील हायकोर्टात अपिल करता येणार आहे.

Nirav Modi : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्र्यांची मंजुरी
लंडन : पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार ६०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करून भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास इंग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मंजुरी दिल्याची माहिती भारतीय राजदूतावासातील सूत्रांनी दिली. नीरज मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र गृहमंत्र्यांना घेतलेल्या या निर्णयाविरोधात नीरव मोदीला १४ दिवसात तेथील हायकोर्टात अपिल करता येणार आहे.