हाँगकाँगमध्ये पोलिसांची निदर्शकांना बेदम मारहाण
By admin | Published: October 16, 2014 08:34 AM2014-10-16T08:34:38+5:302014-10-16T08:34:38+5:30
येथे होणा-या लोकशाहीसाठी निदर्शने करणा-या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. अनेकांची धरपकडही करण्यात आली. १५ दिवसांपासून आज झालेला हा सर्वाधिक हिंसाचार आहे.
हाॅंगकाँग, येथे होणा-या लोकशाहीसाठी निदर्शने करणा-या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. अनेकांची धरपकडही करण्यात आली. १५ दिवसांपासून आज झालेला हा सर्वाधिक हिंसाचार आहे.
निदर्शनस्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार शहरातील सरकाररी कार्यालये व मुख्य रस्त्याला निदर्शकांनी घेराव घातला होता. तो मोडून काढण्यासाठी शेकडो पोलिसांनी निदर्शकांना बाजूला हटविण्यासाठी काळ्या मि-याच्या स्प्रेचा वापर केला. निदर्शक आपला घेराव मोडण्यास तयार नव्हते. त्यांना बेदम मारहाण करत एका तासाच्या आत रस्ता मोकळा करण्यात आलाय निदर्शकांवर अत्याचार करणा-या पोलिसांची एक चित्रफित प्रसिद्ध झाली आहे. यानंतर तिथे तैनात असणा-या पोलिसांची हकलपट्टी झाली आहे. असे सुरक्षा प्रमुखांनी सांगितले आहे. या चित्रफितीत बेड्या घातलेल्या एका युवकाला पोलीस मारहाण करताना दिसत आहेत. टिव्हीबी टिव्हीवर पोलीस व निदर्शकांच्या चकमकीचे फुटेज दाखविण्यात आले, त्यानंतर निदर्शकांत मोठा संताप पसरला असून, आरोपींच्या अटकेची मागणी केली जात आहे.