मानाचा पुरस्कार स्विकारताना पुरस्कारमुर्तीची पॅंट निसटली
By admin | Published: December 10, 2015 04:10 PM2015-12-10T16:10:24+5:302015-12-10T19:48:09+5:30
एखादा मानाचा पुरस्कार स्विकारताना जर पुरस्कारकर्त्याची पॅंट निसटली तर उपस्थितांसमोरच्या काय गत होईल हे सांगता येत नाही. अशीच गत क्रोएशियन हेलसिंकी कमिटी
Next
>ऑनलाइन लोकमत
झाग्रेब, दि. १० - एखादा मानाचा पुरस्कार स्विकारताना जर पुरस्कारमुर्तीची पॅंट निसटली तर उपस्थितांसमोर काय गत होईल याची कल्पना करता येणार नाही. अशीच गत क्रोएशियन हेलसिंकी कमिटी फॉर ह्यूमन राइट्सचे प्रमुख इवान वोनीमीर सीसाक यांची झाली.
देशाच्या राष्ट्रपती कोलिंदा ग्रैबर-कितारोविक यांच्या हस्ते इवान वोनीमीर सीसाक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांची पॅंट निसटली आणि काही क्षणभर कार्यक्रमात उपस्थितांच्या चेह-यावर हास्याची लकेर उमटली. इवान वोनीमीर सीसाक यांची पॅंट निसटली, यावेळी त्यांची अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत पॅंट पुन्हा वर घेत परिधान केली. दरम्यान, त्यांचा या क्षणाची छायाचित्र सोशल मिडियात व्हायरल होताना दिसत आहेत.