भयंकर...! लॉस एंजेलिस, हॉलिवूड हिल्सला आगीने घेरले; अभिनेत्यांची अनेक घरे भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 10:59 IST2025-01-09T10:59:11+5:302025-01-09T10:59:34+5:30
आगीमुळे परिस्थिती बिघडलेली पाहून मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इटलीचा दौरा रद्द केला आहे. अनेक घरे जळून खाक झाली आहेत. तिथे इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे.

भयंकर...! लॉस एंजेलिस, हॉलिवूड हिल्सला आगीने घेरले; अभिनेत्यांची अनेक घरे भस्मसात
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात नेहमीप्रमाणे आग लागली आहे. ही आग एवढी भडकली आहे की आता लॉस अँजेलिसच्या नागरी वस्ती आणि ह़ॉलिवूडची लोक राहतात त्या हिल्सपर्यंत पोहोचली आहे. यामुळे जवळपास १ लाख लोकांना घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. या आगीत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
लॉस एंजेलिस परिसरातील आगीमुळे, अधिकाऱ्यांनी लाखो लोकांना शक्य तितक्या लवकर त्यांची घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. आजूबाजूला धुराचे आणि धुळीचे ढग दिसत आहेत. आग एवढी भडकली आहे की ती उंचावरच्या नारळाच्या झाडालाही सोडलेले नाही.
पॅसिफिक पॅलिसेड्स, ईटन आणि हर्स्टमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमधून पाणी फवारले जात आहे. परंतू, हे पुरेसे ठरत नाहीय. पॅलिसेड्समध्ये १५,००० एकर, ईटनमध्ये १०,००० एकर आणि हर्स्टमध्ये ५०० एकरपेक्षा जास्त जमीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
लोकांनी आपली वाहने रस्त्यांवरच सोडून दिली आहेत. यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या, अँबुलन्स, पोलिसांच्या गाड्यांना वाट करून देण्यासाठी बुलडोझरने या वाहनांना बाजुला केले जात आहे. अनेक घरांना वाचविण्यासाठी लोकांनी आजुबाजुची झुडुपे कापून टाकली आहेत. यामुळे आग घरांपासून काही अंतरावर संपत आहे. अनेक घरांना आगीने वेढले आहे.
आगीमुळे परिस्थिती बिघडलेली पाहून मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इटलीचा दौरा रद्द केला आहे. अनेक घरे जळून खाक झाली आहेत. तिथे इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे.