Russian University firing: भयानक! माथेफिरूचा रशियन विद्यापीठात गोळीबार; 8 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:06 PM2021-09-20T14:06:09+5:302021-09-20T14:08:03+5:30
Firing in Russian University: कॉलेजच्या प्रबंधनाने सोमवारी सकाळी परिसरात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना याबाबत इशारा दिला होता. शक्य असल्यास परिसर सोडावा किंवा एखाद्या खोलीत बंद करून घ्यावे. तपास अधिकाऱ्यांनी मृत्यूंची संख्या 8 सांगितली आहे.
मॉस्को : रशियाच्या एका विद्यापीठामध्ये एका माथेफिरूने गोळीबार केला आहे. यामध्ये कमीतकमी आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारानंतर सगळीकडे पळापळ झाली असून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी मिळेल तिथून उड्या टाकल्या, सभागृहांमध्ये लपल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Gunman attacks a university in the Russian city of Perm. 8 died, 6 injured.)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये घाबरलेले विद्यार्थी जीव वाचविण्यासाठी खिडक्यांमधून उडी मारताना दिसत आहेत. Russia Today नुसार या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पर्म स्टेट यूनिवर्सिटीमध्ये हा हल्ला झाला आहे.
रशियन मीडियानुसार शूटरची ओळख पटली असून 18 वर्षीय Timur Bekmansurov असे त्याचे नाव आहे. त्याचाही घटनास्थळी गोळी लागून मृत्यू झाला. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोठे हत्यार घेऊन विद्यापीठाच्या इमारतीत घुसताना दिसत आहे. पर्म शहर हे मॉस्कोपासून 700 मैल दूर आहे.
Gunman attacks a university in the Russian city of Perm. Deaths and injuries being reported.
— Murad Gazdiev (@MuradGazdiev) September 20, 2021
Faculty and students were filmed jumping out of windows pic.twitter.com/DyNHPEaLwR
कॉलेजच्या प्रबंधनाने सोमवारी सकाळी परिसरात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना याबाबत इशारा दिला होता. शक्य असल्यास परिसर सोडावा किंवा एखाद्या खोलीत बंद करून घ्यावे. तपास अधिकाऱ्यांनी मृत्यूंची संख्या 8 सांगितली आहे.