हॉरिबल Video! अंतराळात जाणारे रॉकेट फुटले, जपानच्या लाँचिंग पॅडवर आगीचे लोळ उठले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 08:29 AM2024-03-13T08:29:43+5:302024-03-13T08:29:55+5:30
जपानमध्ये ही घटना घड़ली आहे. स्पेस वन ही कंपनी आपले पहिलेच रॉकेट अंतराळात पाठवत होती.
कॅनॉन कंपनीचे पाठबळ असलेल्या स्पेस वन या जपानी स्टार्टअप कंपनीचे अंतराळात जाणारे पहिलेच रॉकेट लाँचिंगनंतर फुटले आहे. यामुळे लाँचिंग पॅडवर रॉकेटमधील इंधन पडून आगीचे लोळ उठले होते. व्हिडीओतून याची तीव्रता कळत आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणी जखमी किंवा जिवीतहाणी झाल्याचे वृत्त आलेले नाही.
जपानमध्ये ही घटना घड़ली आहे. स्पेस वन ही कंपनी आपले पहिलेच रॉकेट अंतराळात पाठवत होती. कैरॉस रॉकेट हे उड्डाण करू लागले. काही मीटर अंतरावर हवेत जाताच मोठा स्फोट झाला आणि या रॉकेटमधील यंत्रे, इंधनाने पेट घेतला. हे सर्व क्षणार्धात खाली कोसळले आणि लाँचिंग पॅडवर देखील आग लागली.
🚨🇯🇵 BREAKING: JAPAN'S SPACE ONE ROCKET EXPLODES DURING LAUNCH FROM SOUTHERN JAPAN
— Mario Nawfal (@MarioNawfal) March 13, 2024
Source: @BNONewspic.twitter.com/cMpHdqj9OF
काही क्षणांत तिथे आग आणि धुराचे साम्राज्य पसरले होते. जपानची राजधानी टोकियोपासून ४२० किमी अंतरावर पोर्ट की या ठिकाणी ही दुर्घटना घडली.