बांगलादेशात मालवाहू जहाज आणि प्रवासी नौका यांच्या भीषण अपघात; २७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 09:17 PM2021-04-05T21:17:41+5:302021-04-05T21:19:06+5:30
Launch capsizes after collision with cargo vessel in bangladesh : रविवारी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर आज २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मदत पथकात नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन सेवा आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.
ढाका - बांगलादेशच्या शीतलाख्या नदीत १०० हून अधिक लोक घेऊन जाणाऱ्या नौका मालवाहू जहाजाला जोरदार आपटल्याने झाल्याने २७ जण मृत्युमुखी पडले. राजधानी ढाकाच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे १६ किमी अंतरावर असलेल्या नारायणगंज जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. मदत कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर आज २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मदत पथकात नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन सेवा आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.
बांगलादेश इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (बीआयडब्ल्यूटीए) चे अध्यक्ष कोमोडोर गुलाम सडेक यांनी येथे पत्रकारांना सांगितले की, “बुडलेल्या बोटीला बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. ‘एसकेएल-3’ या मालवाहू जहाजाच्या टक्करेने मुंशीगंज स्थित शीतलाख्या नदीमध्ये सय्यदपूर कोळ घाटाजवळ ‘एमएल सबीत अल हसन’ ही नौका बुडली.
टक्करेनंतर मालवाहू जहाज फरार झाले, असे ढाका ट्रिब्यूनने प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत सांगितले. नारायणगंजचे उपायुक्त मुस्तैन बिला म्हणाले की, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठित केली गेली आहे. ते म्हणाले की, मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हा प्रशासन 25-25 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात येतील. चौकशी समितीला येत्या पाच दिवसांत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
बीआयडब्ल्यूटीएनेही या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. या नौका अंदाजे दीडशे लोक असल्याचा अंदाज आहे. किनारपट्टीचे पोलिस प्रभारी दीपक चंद्र साहा यांनी माहिती दिली की ५०-६० लोक नदीच्या काठावर पोहले आहेत, त्यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.