दहशतवाद्यांनी उडवले 'पत्रकाराचे शीर', व्हिडीओ केला प्रदर्शित
By admin | Published: August 20, 2014 11:17 AM2014-08-20T11:17:23+5:302014-08-20T12:18:22+5:30
अमेरिकेने इराकवर हवाई हल्ले करण्याच्या निर्णयाचा निषेधार्थ 'आयएसआयएस'च्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या पत्रकाराचे 'शीर' उडवले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे.
Next
>
ऑनलाइन लोकमत
बगदाद, दि. २० - -अमेरिकेने इराकवर हवाई हल्ले करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ 'आयएसआयएस'च्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या जेम्स फॉले या पत्रकाराचे 'शीर' उडवले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी त्यांनी आणखी एका पत्रकाराला पकडल्याचे दाखवत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढील निर्णयावर त्याचे जीवन अवलंबून असेल अशी धमकीही दिली आहे.
'अ मेसेज टू अमेरिका' या नावाने हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. 'आयएसआयएस'च्या ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले केले, त्यात अनेक मुसलमानांना जीव गमवावा लागला आहे. हे हल्ले असेच सुरू राहिले तर अमेरिकी नागरिकांना ठार करू, हे ओबामा यांनी लक्षात ठेवावे, अशी धमकीही या व्हिडीओत देण्यात आली आहे. त्यानंतर लगेच जेम्स याचे शीर उडवण्यात आले.
जेम्स हे गेल्या पाच वर्षांपासून पश्चिम आशियातून रिपोर्टिग करत होते व दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात त्यांचे सीरियातून अपहरण करण्यात आले होते.
हा व्हिडीओ प्रदर्शित झाल्यानंतर अमेरिकेतर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. 'जेम्स यांची हत्या करण्यात आल्याचा आयएसआयएसचा व्हिडीओ आम्ही पाहिला आहे. गुप्तचर यंत्रणा त्या व्हिडीओची सत्यता पडताळून पहात आहेत, असे त्यात म्हटले आहे.
इराकमधील दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी इराकवर हवाई हल्ला करण्याचा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे. त्या निषेधार्थचे दहशतवाद्यांनी हे कृत्य केले आहे.