हत्येच्या आरोपातून होस्नी मुबारक यांची सुटका
By admin | Published: November 30, 2014 02:10 AM2014-11-30T02:10:18+5:302014-11-30T02:10:18+5:30
2क्11 मधील क्रांतीदरम्यान शेकडो नि:शस्त्र निदर्शकांची हत्या केल्याच्या आरोपातून इजिप्तचे बडतर्फ अध्यक्ष होस्नी मुबारक यांची येथील न्यायालयाने शनिवारी निदरेष सुटका केली.
Next
कैरो : 2क्11 मधील क्रांतीदरम्यान शेकडो नि:शस्त्र निदर्शकांची हत्या केल्याच्या आरोपातून इजिप्तचे बडतर्फ अध्यक्ष होस्नी मुबारक यांची येथील न्यायालयाने शनिवारी निदरेष सुटका केली. याच क्रांतीने मुबारक यांची 3क् वर्षाची निरंकुश राजवट संपुष्टात आणली होती.
न्यायमूर्ती मोहंमद कमेल अल राशिदी यांनी मुबारक यांना इस्रायलला गॅस निर्यात करण्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपातूनही मुक्त केले. न्यायमूर्तीनी हत्येचा आरोप फेटाळताना दंड संहितेअंतर्गत गुन्ह्यांसाठी मुबारक यांच्यावर खटला चालविणो योग्य नसल्याचे सांगितले. आजच्या निकालामुळे मुबारक यांना जून 2क्12 मध्ये ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द झाली. त्याचबरोबर 2क्11च्या क्रांतीदरम्यान 846 सरकारविरोधी निदर्शकांच्या हत्येचे कथितरित्या आदेश दिल्याप्रकरणी तसेच कथितरित्या लाभ प्राप्त करण्यासाठी गॅसची कमी दराने निर्यात केल्या प्रकरणीही त्यांना कोणतीही शिक्षा होणार नाही.
न्यायाधिशांनी मुबारक यांची सुटका करून त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली फेरसुनावणी संपुष्टात आणताच न्यायदान कक्षात आनंदाची लाट उसळली. न्यायालयाने मुबारक यांच्या सात माजी सुरक्षा कमांडरांनाही सरकारविरोधी निदर्शकांच्या हत्ये प्रकरणी निरपराध ठरविले.
या कमांडरांमध्ये इजिप्तचे माजी गृहमंत्री हबीब अल अदली यांचा समावेश आहे. मुबारक यांच्या मुलांचीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुटका करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)