डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 03:38 AM2021-01-14T03:38:17+5:302021-01-14T03:46:56+5:30
अमेरिकेत दुपारी साडेचारच्या दरम्यान (भारतीय वेळेनुसार पहाटे तीनच्या दरम्यान) हा प्रस्ताव मंजूर झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या शपथविधीस आणि सूत्रे हाती घेण्यास अवघा आठवडा राहिला असताना, हा निर्णय झाला आहे
वॉशिंग्टन - अमेरिकेचे वादग्रस्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटेव्हजने स्वीकारला. महाभियोग चालवण्याच्या बाजूने २३२ तर महाभियोगाविरुद्ध १९७ जणांनी मतदान केले. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या १० सदस्यांनीही महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. चार जण तटस्थ राहिले. यामुळे अमेरिकेच्या इतिहासात दोनदा महाभियोग दाखल झालेले ट्रम्प हे एकमेव अध्यक्ष ठरले.
Majority of US House votes to impeach US President Donald Trump: AFP news agency https://t.co/C90g8ygIm1
— ANI (@ANI) January 13, 2021
अमेरिकेत दुपारी साडेचारच्या दरम्यान (भारतीय वेळेनुसार पहाटे तीनच्या दरम्यान) हा प्रस्ताव मंजूर झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या शपथविधीस आणि सूत्रे हाती घेण्यास अवघा आठवडा राहिला असताना, हा निर्णय झाला आहे. आता पुढील प्रक्रिया सिनेटमध्ये चालेल. मागील बुधवारी शेकडो ट्रम्प समर्थकांनी कॅपिटोल इमारतीकडे कूच केल्याने हा अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासातील काळा बुधवार ठरला होता. त्यानंतर या बुधवारी (ता. १३) ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा निर्णय तेथील प्रतिनिधी सभागृहाने घेतला आहे.