अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालणार महाभियोग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 07:46 AM2019-12-19T07:46:28+5:302019-12-19T07:55:39+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रक्रियेच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.

The House of Representatives has passed two articles of impeachment against US President President Donald Trump. | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालणार महाभियोग

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालणार महाभियोग

Next

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रक्रियेच्या प्रस्तावास प्रतिनिधी सभेत मंजुरी देण्यात आली आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मतदान घेतलं असता 230 विरुद्ध 197 मतांनी हा प्रस्ताव पारीत करण्यात आला. प्रतिनिधी सभेत जास्त करून सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग कारवाई करण्याच्या बाजूनं मतदान केलं. तत्पूर्वी ट्रम्प यांनी प्रतिनिधी सभेतील स्पीकर नॅन्सी पेलोसी यांना एक पत्र लिहून महाभियोग प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली होती. महाभियोग या कारवाईच्या माध्यमातून डेमोक्रेटचे सिनेटर शक्तीचा दुरुपयोग करत असून, हे असंवैधानिक असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकेच्या इतिहासात असं जवळपास अनेक वर्षांनी होत आहे. 

डेमोक्रेट्स नेते नॅन्सी पेलोसी यांच्या मते, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संविधानाचा घोर अपमान केला आहे. कोणीही कायद्याहून श्रेष्ठ नसल्याचंही नॅन्सी म्हणाल्या होत्या. ट्रम्प यांनी यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सैन्य कारवाईची धमकी दिली होती. तसेच त्यांनी दबाव टाकत माजी उपराष्ट्राध्यक्ष बाइडन आणि त्यांचा मुलगा हंटर याच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आदेश दिले होते. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


यूक्रेनचे राष्ट्राध्यक्षांशी राजकीय प्रतिस्पर्धासंदर्भात चर्चा केल्याचं ट्रम्प यांनी मान्य केलं असलं तरी असा कोणत्याही प्रकारचा मी दबाव टाकला नसल्याचा त्यांनी खुलासा केला आहे. खरं तर माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडन 2020मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत ट्रम्प यांना टक्कर देऊ शकतात. 100 सदस्यांची संख्या असलेल्या सिनेटनं ट्रम्प यांच्या पक्षाचे 53 खासदार आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला सिनेटची मंजुरी मिळाल्यास ट्रम्प यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
 
काय असते महाभियोग प्रक्रिया ?
अमेरिकेच्या द्वि सदनीय विधिमंडळाला अमेरिकी काँग्रेस असं संबोधलं जातं. सिनेट (Senate) आणि प्रतिनिधी सभा  (House of Representatives) असे दोन सदन आहेत. अमेरिकेच्या संविधानानुसार, प्रतिनिधी सभेच्या बहुमतानंतर राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभिगोयाची प्रक्रिया सुरू केली जाते. राष्ट्राध्यक्षांव्यतिरिक्त असैन्य अधिकाऱ्याविरोधातही महाभियोग आणता येतो. देशद्रोह, लाच घेणे आणि मोठ्या गुन्हांचा आरोप असल्यावरच अशा प्रकारची कारवाई करण्यात येते. 


आता काय होणार ?
आतापर्यंत अमेरिकेत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला महाभियोगाच्या माध्यमातून हटवण्यात आलेलं नाही.  प्रतिनिधी सभा  (House of Representatives) महाभियोगाचा प्रस्ताव पारित होऊ शकतो. परंतु सिनेटमध्ये तो पारीत करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असतं. परंतु सिनेटमध्ये रिपब्लिकन खासदारांची संख्या जास्त आहे. 

Web Title: The House of Representatives has passed two articles of impeachment against US President President Donald Trump.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.